‘माणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय करोना’, पोलीस कर्मचाऱ्याची हृदयपर्शी कविता

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 150 हून अधिक देशांत झाला आहे. भारतामध्ये 298 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 63 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरांमध्ये लॉक डाऊनच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत. तर रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलं आहे.


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना रविवारी (दि.22) जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन केले आहे. यामध्ये जनतेनं सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मिम्स, जनजागृती करणारे मेसेज प्रचंड व्हायरल होत आहेत. कोरोनावरील गाणी आणि कविता देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा होत आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस नाईक अभिजित घाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी केलेली कोरोनावरील कविता हृदयाला भिडणारी आहे, वास्तवाच भान शिकवणारी आहे. तर वास्तव परिस्थिती दाखवून लोकांचे डोळे उघडण्यासाठी ही कविता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या कवितेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिजित घाटे यांच्या सर्जनशीलतेचे नेटकऱ्यांसह पोलीस खात्यानेही तोंडभरून कौतुक केलं आहे.