सोलापूरमध्ये संचारबंदीत 2000 मोटारसायकली जप्त, 68 जणांना 12 तास पोलिस ठाण्यात बसण्याची शिक्षा

सोलापुर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळुन जवळपास 2 हजार मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत, तर 466 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असुन यातील 66 नागरिकांना 12 तास पोलीस ठाण्यात बसुन राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.या नाकाबंदी चे उल्लंघन करून बाहेर मोटार सायकल वर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कायदेशिर कारवाया करण्यात आल्या आहेत.

या कारवाई मध्ये केवळ सोलापूर शहरात जवळपास 1300 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ग्रामीण पोलीसानीही आपली कारवाई कडक केली आहेत. यात ग्रामीण पोलीसांनी आतापर्यंत जवळपास 700 दुचाकी आणि जवळपास दीडशे चारचाकी वाहनांवर कारवाई केले आहेत तर,466 लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 66लोकांना 12 तास पोलीस ठाण्यात बसुन राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे.सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत जवळपास13गाड्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामीण भाग मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर फिरण्यास मनाई असताना रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या. तर विना मास्क न घालता फिरणार्‍या 66 नागरिकांना पोलिसांनी 12 तास पोलिस ठाण्यात बसण्याची त्यांना शिक्षा दिली. तर अक्कलकोट पोलिसांनी जवळपास150 मोटार सायकली जप्त केल्या असून 15 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूर, सांगोला, अकलूज,बार्शी, करमाळा मोहोळ येथे ही शंभर दीडशे च्या आसपास गाड्या पकडण्यात आल्या आहेत. पकडलेली सर्वच वाहने लॉक डाऊन संपल्यानंतर न्यायालयाकडून सोडवून घ्याव्यात असे आवाहन सोलापूर ग्रामीण चे एस. पी. मनोज पाटील यांनी केले आहे.

दरम्यान शासनाने लॉकडाऊन जाहिर करूनही लोक रस्त्यावर विनाकारण येत असल्याने पोलिस प्रशासन वेगवेगळे प्रयोग करून लोकांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असून यापुढे रस्त्यावर येणार्‍या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्या घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

कोरोना संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे याला रोखण्यासाठी घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्याने शासनाने खबरदारी घेत नागरिकांना दि 30 एप्रिलपर्यंत घरात बसण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान काही नागरिक विनाकारण मोटर सायकलवर व पायी शहरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी कलम 68 प्रमाणे त्यांना पकडून दिवसभर पोलिस ठाण्यात बसण्याची शिक्षा देत आहेत.

संध्याकाळी कलम 69 प्रमाणे त्यांची मुक्तता करण्यात आली. यामध्ये 66 लोकांचा समावेश होता. गेल्या दोन दिवसात मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्‍या 212 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.या मोटर सायकली 30 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सदर मोटर सायकलची मोटार ड्रॅव्हींगचे लायसन्स,इन्शूरन्स,पी.यु.सी व गाडीची कागदपत्रे तपासूनच गाडी ताब्यात दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,वाहतूक शाखेचे बंडोपंत कुंभार,सागर लांडे,नागनाथ डबरे आदी करीत आहेत.