Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापूरात ? पोलिसांचे वसुलीचे टार्गेट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाल्याचा RTI कार्यकर्त्याचा दावा; पोलिसांनी आरोप फेटाळले (व्हिडिओ)

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Police | मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ (Mumbai Sachin Vaze Pattern) आता सोलापूरात (Solapur) राबविला जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist Solapur) वाय. पी. पवार (Y. P. Pawar) यांनी केला आहे. वाय. पी पवार यांनी आरोप केला आहे की, शहर पोलीस आयुक्तालयातील (City Police Commissionerate) क्राईम ब्रँच कडून (Solapur Police Crime Branch) महिन्याकाठी 60 लाख रुपयांचा हप्ता गोळा (Collection 60 Lakh Per – Month) केला जातो. हा प्रकार स्टिंग ऑपरेशनमुळे (Sting Operation) समोर आल्याचा दावा पवार यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे पवार यांनी सांगितले. (Solapur Police)

 

पोलीस आयुक्तालयातून सुरु असलेल्या या वसुली विषयी अँटी करप्शनला (Anti Corruption Bureau (ACB) Solapur) तक्रार केली तर त्यांच्याकडून ही पोलीस आयुक्तालयाला मदत होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी केला आहे. या स्टिंग ऑपरेशन मधील संवाद हा पोलीस कर्मचारी आणि पत्ते क्लब चालवाणाऱ्या मधील असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सोलापूर पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले असून तो व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे. (Solapur Police)

याबाबत सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल (Solapur CP Harish Baijal) यांनी एक चौकशी समिती (Inquiry Committee) नेमली आहे.
त्यातून दोन्ही बाजूची सत्यता पडताळली जाणार आहे.
आणि यातून आलेल्या अहवालानुसार दोषींवर कडक कारवाई करणारं असल्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत.
दरम्यान, माहिती अधीकार कार्यकर्ते वाय. पी. पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रँचशी संबंध असल्याने जाणूनबुजून तिकडे डोळेझाकपणा केला जातो असा ही आरोप केला आहे.
मात्र, असा कुठलाही संबंध असल्यास त्याचे पुरावे सादर करून आरोप सिद्ध (Prove the Allegation) करावे,
आमचे वरिष्ठ आमच्यावर कारवाई (Action) करतील असा निर्वाळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.

 

Web Title :- Solapur Police | solapur police collection target 60 lakh per month claims sting operation RTI Activist Solapur Y P Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा