Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Police | सोलापूर शहरातील चौकात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने भरचौकात मनसोक्त डान्स (Dance) केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. राजेश पवार (Police Constable Rajesh Pawar) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात (Mangalvedha Police Station) कार्यरत आहेत. सोलापरातील रहदारी असणाऱ्या गंगामाई हॉस्पिटल समोरील रस्त्यावर पवार (Solapur Police) यांनी डान्स केला.

 

रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर पोलीस कर्मचारी डान्स करत असल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलिसाचा डान्स करतानाचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. शहराची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे तेच जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पहायचे असा प्रश्न सध्या सोलापूरकरांना पडला आहे.

 

दरम्यान, या घटनेबाबत नागरिकांनी सोलापूर शहर पोलीस दलाला (Solapur Police) माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सदर बाझार पोलीस ठाण्याचे (Sadar Bazar Police Station) पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
पोलीस उपनिरीक्षक डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर डान्स करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश पवार यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

 

Web Title :- Solapur Police | viral video of a policeman leaving work dance in solapur police news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

MP Rahul Shewale | ‘खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न, माझी NIA कडून चौकशी करा’ – खासदार राहुल शेवाळे (व्हिडिओ)