Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाबाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं विविध समस्यांसाठी आंदोलन ! या समस्या सोडविण्यात आलं यश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (Nationalist Student Congress) प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) विद्यार्थी समस्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

1) एकाच प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर पुढील प्रश्न येण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे टाईमर चालू असल्यामुळे वेळ वाया जातो.
2) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांसाठी दुरून यावे लागते, त्यांच्या समस्या विद्यापीठात वेळेवर निवारण होत नाही. त्यामुळे त्यांना मनस्ताप सोसावा लागतो. त्यामुळे त्यांचे निवारण वेळेत झाले पाहिजे.
3) विद्यार्थी मित्रांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर सुविधा करण्यात आली पण त्यामध्ये देखील निष्क्रिय व अनियमितपणा दिसून आला.
4) नियोजन शून्यता, मॉक टेस्ट (सराव) चा अभाव, कुशल मानयुष्यबळाचा अभाव व आपत्र धारक सर्व्हिस प्रोव्हडार, हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकिय दिरंगाई,
MCQ प्रश्नांचे प्रश्न पेढी (प्रश्नांची बँक) न पुरवणे.यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत..
५) ऑनलाईन परीक्षेत प्रश्न कसे असतील, यांची माहिती नसल्याने विद्यार्थी मित्रांना ताण पडत आहे.
६) डिव्हाईस व कनेक्टीव्हीटीचा आभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही. लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही. असे एक ना अनेक समस्या विद्यार्थीना येत आहेत
7) वारंवार साईट क्रश हा प्रकार घडत असल्याने, MCQ न दिसणे त्यामुळे वेळ वाया जात आहे.
8) एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखा निहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्या होत्या. त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता..

आज कुलगुरु यांच्या सोबत झालेल्या बैठकीत खालील समस्या सोडवण्यात यश आले
1)
बॅकलॉग चे विद्यार्थी कोरोना (Corona) काळात परिक्षेचा फॉर्म भरू शकले नाहीत त्यांची फॉर्म भरण्याची मुदत संपली होती. ती मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवून घेतली असे आश्वासन कुलगुरु यांनी दिले.
2) हेल्पलाइन(Helpline) ची संख्या थेट 20 केली व गरज भासल्यास त्यापेक्षा जास्त करू असे आश्वासन दिले.
३) अवकाळी पावसामुळे ज्या गावची वीज (Electricity) खंडित झाली आहे असे विद्यार्थी परिक्षापासून वंचित आहेत. अशांची देखील पुन्हा परीक्षा घ्यावी यावर कुलगुरु यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला..

राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम, प्रथमेश खटके पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), निशांत सावळे (शहराध्यक्ष) राकेश साळुंखे, अतिष बचुटे, अजिंक्य शिंदे, किरण घोडके, सुरज जाधव, अजय चव्हाण, बाळासाहेब भिंगारे, सागर भोसले, श्रीनिवास भिंगारे, गणेश बचुटे, आशिष शिंदे, आशु गायकवाड, विश्वजित राघव, राकेश खळदकर यांची उपस्थिती होती.