Solapur Rural Police | एमडी ड्रग्स प्रकरणातील आंतर राज्य टोळीचा मुख्य सूत्रधार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Rural Police | सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ तालुक्यातून चालवणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा ऑक्टोबर महिन्यात पर्दाफाश केला होता. आरोपी चंद्रमौळी एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसी येथील कारखान्यात मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सुत्रधाराला कर्नाटकातल्या कलबुर्गी येथून अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराला हैदराबाद येथून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे.(Solapur Rural Police)

या प्रकरणातील आरोपी हे पर जिल्ह्यातील तसेच परराज्यातील असुन ते आपले वास्तव्याचे ठिकाण सतत बदल होते. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींचा प्रयागराज, उत्तर प्रदेश, रिवा मध्य प्रदेश, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, तेलंगणा, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील बरगढ, कर्नाटकातील बिदर, तेलंगणा येथील जहीराबाद येतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 कोटी 82 लाख 99 हजार 204 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये एमडी, तसेच एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल जप्त केला आहे.

या टोळीचा मुख्य सूत्रधार हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, राजस्थान या भागातील अशा प्रकारच्या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार असुन याच भागात तो आपले अस्तित्व लपून राहत होता. तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा सुगावा लागेपर्यंत पळून जाण्यात यशस्वी होता. 14 फेब्रुवारी रोजी हा आरोपी कर्नाटकतील कलबुर्गी येथील लुंबीनी ग्रॅन्ड हॉटेल येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एलसीबीच्या पथके कलबुर्गी येथे गेली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. तर त्याच्या साथीदाराला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली.

गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार याचे राज्य व आंतरराज्य गुन्हे अभिलेख तपासणी केली असता, त्याच्यावर 2010 पासुन
महाराष्ट्र व इतर राज्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोहोळ, खार (मुंबई शहर), नाशिक रोड,
माणिकपूर, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई, मुरबागअली (कर्नाटक), ओंगल (आंध्रप्रदेश), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चेन्नई,
हैदरबाद, अहमदाबाद याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 26 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली
एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे,
पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड,
सहायक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, दिपाली जाधव,
अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते तसेच सायबर पोलस स्टेशनचे पोलीस
अंमलदार अभिजीत पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन