Coronavirus : सोलापूरमध्ये ‘कोरोना’चा दुसरा बळी, 69 वर्षीय महिलेचा मृत्यू, जिल्हयात 13 पॉझिटिव्ह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्हयात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. सोलापूरमध्ये 13 कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. शहरातील इंदिरानगर परिसरात राहणार्‍या 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळं आज (रविवार) सकाळी मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 2 झाली आहे.

शहर आणि जिल्हयात एकुण 718 रूग्ण अ‍ॅडमिट असून आतपर्यंत 505 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 490 हे निगेटिव्ह असून इतर 15 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. 15 पैकी आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी मृत्यू झालेली 69 वर्षीय महिला ही शहरातील इंदिरानगर परिसरात रहावयास होती. त्यांच्या कुटूंबातील 8 जणांना तपासणीला पाठविण्यात आले आहे. मृत्यू झालेली महिला इतर कोणाच्या संपर्कात आली होती काय याबाबतची माहिती घेण्याचे काम चालु असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, इंदिरानगर परिसर कंटेन्मेंट परिसर म्हणून जाहीर करण्यात आला आहे.