सोलापूर : मनपा आयुक्तांची तात्काळ बदली करा, शिवसेनेची मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर महानगरपालिकेने कोरोना बाधित क्षेत्रात उपाय योजना करण्यात चालढकल केली आहे असे ताशेरे कोरोना चा आढावा घेण्यासाठी दिल्लीहुन आलेल्या केंद्रीय पथकाने केली असून अशीच मागणी यापूर्वी शिवसेनेचे कर्तबगार नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी ही केली होती. केंद्रीय पथकाने ओढलेल्या ताशे-यानंतर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी ही केली असून संपूर्ण सोलापूर शहरातील जनतेची ही हीच मागणी असल्याचे आता पुढे येत आहे. अंत्यत निष्क्रिय आयुक्त म्हणून सध्याचे आयुक्त काम करत आहेत. त्यांचे कोणत्याच कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष नाही. ते निव्वळ निष्क्रिय आणि कामचुकार आहेत त्यामुळे त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी शहर वासीयांमधून होत आहे. सध्याचे आयुक्त सोलापूर ला आल्या पासून त्यांनी शहराच्या कोणत्याही प्रश्नांकडे लक्ष दिले नाही शहरातील कचऱ्याची समस्या असो की पाणी पुरवठा असो,अथवा स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे असोत यात मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण झाली आहे तरीही आयुक्त या कडे लक्ष देत नाहीत.

जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांचे आदेश आयुक्त पाळत नाहीत तर,आयुक्तांचे मनपा अधिकारी व कर्मचारी ऐकत नाहीत.कर्मचारी व अधिका-यावर आयुक्तांचा धाक नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आयुक्त कोणत्याही उपाययोजना करत नाहीत ते गप्प बसून आहेत कोरोनाची लागण मोठया प्रमाणात शहरात झालेली आहे असे असतानाही कोरोना बाधित क्षेत्रात सोलापूर महानगरपालिका प्रशासन व सोमपा आरोग्य खाते काहीच करत नाही,महसुल यंत्रणेचे कर्मचारी सोलापूर शहरातील कोरोना बाधित क्षेत्रावर लक्ष दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे अन्यथा सोलापूर ची गंभीर अवस्था झाली असती. त्यामुळे निष्क्रिय आयुक्त तातडीने हटवून चांगला आयुक्त सोलापूर मनपा साठी नेमण्यात यावा अशी ही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, सोलापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीच उपाय योजना केली जात नाही, शहरात फवारणी किंवा स्यानेटायझिंग अथवा निर्जंतुकीकरण केले जात नाही. शहरात सर्वत्र रस्त्यावर “मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत, सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा बेफिकीर झाली आहे,कोरोनाच्या बाबतीत झोपडपट्टी चा भाग, गलिच्छ वस्ती, आणि दाट लोकवस्त्यांमध्ये स्वछतेचे तीन तेरा वाजले आहेत,सोलापूर मध्ये कोरोना चा संसर्ग वाढला तर त्यास केवळ सोलापूर महापालिका आयुक्तच जबाबदार असतील असेही नागरिक म्हणत आहेत, सोलापूर शहरात 220 पेक्षा जास्त झोपड्या व झोपडपट्टी शहरात आहेत, आशा ठिकाणी तर निर्जंतुकिकरण होणे गरजेचे आहे परंतु ते केले जात नाही, पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सोलापूर शहरात होम टू होम सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते, पण या आदेशाला पायदळी तुडविण्यात आले आहेत.

महत्वाचे म्हणजे कोरोना आजाराचे सर्व रुग्ण हे सोलापूर शहरातील असताना ही जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेल्या महसूल यंत्रणेला सहकार्य न करता सोलापूर महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त व अधिकारी गायब झाले आहेत ‘ सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण व क्वारंटाईन रुग्ण हे केगाव आणि सिंहगड कॉलेज येथे आणि सोरेगाव येथे आहेत त्यांची जबाबदारी ही सोलापूर महापालिकेची आहे असे असतानाही महापालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी या कामात सहकार्य करत नसल्यामुळे आयुक्त यांचा त्यांच्यवर वरदहस्त आहे का अशी ही चर्चा सर्वत्रसुरू आहे.

अशीच परिस्थिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबतीत ही आहे जि प चे अधिकारी महसूल च्या यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार नाहीत प्रांताधिकारी निकम यांनी ही बाब महापौर यांच्या कानावर घातली असता उलट केगाव येथुन निकम याची बदली करण्यात आली यामुळे सोलापूर महानगरपालिका चे सर्व उपयुक्त व अधिकारी हे करतात तरी काय असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे कोरोना ची लागण ही मुख्यत्वे झोपडपट्टीच्या आणि गवसु अंतर्गत वसाहती मध्ये मोठया प्रमाणावर लागू झाली आहे झोपडपट्टी च्या भागात लक्ष देण्यासाठी आयुक्तांनी अधिकारी नेमावेत अशी ही मागणी शहरातील अनेक संघटना नी केली होती तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
    पत्रकार
                                                                                                                    महेश गायकवाड