Surya Grahan June 2021 : सूर्यग्रहण 10 जून रोजी, 15 दिवसांच्या आत दोन ग्रहणांमुळे होणार उलथा-पालथ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हे वर्ष खगोलीय दृष्टीने खुप महत्वाचे यासाठी आहे कारण या वर्षी चार ग्रहण लागणार आहेत. यामध्ये दोन सूर्य Surya Grahan आणि दोन चंद्र ग्रहणांचा समावेश आहे. या ग्रहणांचा संबंध भारताशी यासाठी नाही कारण यापैकी कोणतेही ग्रहण भारतातून दिसणार नाही.

Mansoon केरळात झाला दाखल !

26 मे रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागले होते जे भारतात बहुतांश भागात दिसले नव्हते. आता 10 जून रोजी लागणारे सूर्य ग्रहण Surya Grahan सुद्धा असेच असणार आहे. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, यासाठी सूतकसह धार्मिक नियम सुद्धा लागू होणार नाही.

पंडित दीपक मालवीय ज्योतिषाचार्य यांच्यानुसार, सूर्यग्रहणाचा परिणाम होणार नसल्याने आणि सूतक पाळायचे नसल्याने 10 जून रोजी येणारे इतर दोन सण वट सावित्री आणि शनी जयंती साजरी करण्यावर कोणताही प्रतिबंध नसेल. मात्र, ते 15 दिवसांच्या आत दोन ग्रहणांच्या घटनांना नैसर्गिक उलथा-पालथीचे मोठे कारण मानत आहेत.

पंडित दीपक मालवीय यांनी सांगितले की, ज्योतिषमध्ये 15 दिवसांच्या आत दोन ग्रहण लागणे अशुभ मानले जाते.
या कारणामुळे नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात. याशिवाय हे राशींवर सुद्धा आपला शुभ-अशुभ परिणाम टाकते.
15 दिवसांच्या आत लागणार्‍या या ग्रहाणाचा परिणाम जगात गोंधळ निर्माण करू शकतो.
10 जूनला लागणारे सूर्य ग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपेल.
हे ग्रहण प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप आणि एशियात आंशिक व उत्तर कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये पूर्ण दिसेल.
या ग्रहणाचा प्रभाव वृषभ रास आणि मृगशिरा नक्षत्रात जास्त दिसेल.
हे एक वलयाकार सूर्य ग्रहण असेल. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येतो,
परंतु त्याचा आकार पृथ्वीवरून पाहिल्यास तेवढा दिसत नाही की तो सूर्याला पूर्णपणे झाकत आहे, तेव्हा अशा स्थितीला वलयाकार सूर्य ग्रहण म्हणतात.

HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

वलयाकार सूर्य ग्रहणात चंद्राच्या बाहेरील किनार्‍यावर सूर्य एका चमकदार रिंग म्हणजे आंगठीप्रमाणे दिसतो. तर 2021 चे दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण 4 डिसेंबरला लागेल,
जे एक पूर्ण सूर्य ग्रहण असेल. पूर्ण सूर्य ग्रहणात चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला पूर्णपणे झाकतो. यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहचत नाही.
वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण अंटार्कटिका, दक्षिण अफ्रीका, अटलांटिकाचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतच दिसेल.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…