२ जुलैला दिसणार वर्षातील पहिले पूर्ण ‘सूर्यग्रहण’ ; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ वर्षातील दुसरे सूर्यग्रहण उद्या म्हणजे २ जुलैला होणार आहे. या दरम्यान सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येईल. यामुळे सूर्य झाकला जाईल. हे सूर्यग्रहण जगातील काही भागातच दिसेल. भारतामध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी रात्र असेल त्यामुळे हे सूर्यग्रहण भारतात पाहता येणार नाही. हे सूर्यग्रहण २०१९ वर्षातील पहिले पूर्ण सूर्यग्रहण असेल. याच वर्षात ६ जूनला एक सूर्यग्रहण झाले होते. याच जुलै महिन्यात १६ जुलैला चंद्रग्रहण होईल. वर्षाच्या शेवटी २६ डिसेंबरला तिसरे सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसेल.

या भागात दिसेल उद्या होणारे सूर्यग्रहण 

दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, दक्षिण मध्‍य अमेरिका आणि अर्जेंटीना या ठिकाणी जवळपास पाच तासासाठी सूर्यग्रहण दिसून येईल. हे सूर्यग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार १० वाजून २५ मिनिटाला सुरु होईल. रात्री ३ वाजून २१ मिनिटांनी ग्रहण समाप्त होईल.

सूर्यग्रहण काय आहे ?

पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याबरोबर सूर्याभोवती देखील फिरते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. यामुळे जेव्हापण चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये एका विशिष्ठ कोनात येतो तेव्हा पृथ्वीवर सूर्य पूर्णपणे किंवा आंशिकपणे दिसत नाही. याच घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण अमावस्येला घडून येते तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला घडून येते. सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर