21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, भारतावर होणार ‘हा’ परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 21 जून 2020 रोजी संपूर्ण भारतभर कंकणाकृती आणि खंडग्रास स्वरूपात सूर्यग्रहण दिसेल. हे ग्रहण मृगशिरा, आर्द्रा नक्षत्र आणि मिथुन राशीत लागणार आहे. राशि चक्रांखेरीज या ग्रहणांचा भारतावर काय परिणाम होईल हे जाणून घेऊया.

ग्रहण वेळ
ग्रहणाची सुरुवात – सकाळी 9 वाजून 15 मिनिट
कंकणाकृती ग्रहणाची सुरुवात – सकाळी 10 वाजून 17 मिनिट
कंकणाकृती ग्रहण समाप्त – दुपारी 2 वाजून 02 मिनिट
ग्रहण केव्हा संपेल – दुपारी 3 वाजून 04 मिनिट
ग्रहणाचा एकूण वेळ – 5 तास 48 मिनिटे

सूर्यग्रहण कुठे कुठे दिसेल:
हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतासह दक्षिण पूर्व युरोप, उत्तर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, बर्मा, फिलिपाईन्समध्ये दिसेल.

सुतक वेळ:
20 जून 2020 रोजी रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल आणि ग्रहण संपल्यावर संपेल.

राशि चक्रानुसार सूर्यग्रहण प्रभाव:
या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर होईल. ग्रहण काळात कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

मेष – धन लाभ होईल, कामांत यश मिळेल, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ – मोठी गुंतवणूक करण्यास टाळा, पैशाची हानी होऊ शकते, प्रत्येक कृती काळजीपूर्वक करा.

मिथुन – मनात भीती राहील, वाहन चालवताना काळजी घ्या, यामुळे दुखापत होऊ शकते.

कर्क – पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, पैशाचे नुकसान होण्याचे योग्य आहेत.

सिंह – प्रगतीची संधी मिळेल, धनलाभाचा योग आहे. प्रवास टाळा.

कन्या – आजार त्रास देऊ शकतात, अनेक गोष्टींबद्दल भीती मनात राहील.

तूळ – मुलांची काळजी घ्या, तुमच्या मनात चिंता वाढेल, प्रत्येक काम काळजीपूर्वक करा.

वृश्चिक – साधारण लाभ होतील, शत्रूंकडून भीती निर्माण होईल. अनावश्यक खर्च वाढेल.

धनू – जीवनसाथीला समस्या होऊ शकतात, आरोग्याची काळजी घ्या.

मकर – आजार त्रास देऊ शकतात, उत्तम आहार घ्या, तुमच्या मनात चिंता निर्माण होईल.

कुंभ – खर्च वाढेल, कामे लांबणीवर पडतील, धीर धरा. वादविवाद टाळा.

मीन – तुम्हाला कामात यश मिळेल, धन लाभ होऊ शकेल.

सूर्यग्रहण प्रभाव
भारतातील बर्‍याच भागात पाऊस नसल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होईल. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यासारख्या देशांमध्ये नैसर्गिक प्रकोप आणि राजकीय निर्णयांमुळे पैशाचे नुकसान होऊ शकते. जगातील प्रमुख देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होईल, युद्धासारखी परिस्थिती उद्भवू शकेल. भारतातील यमुनेच्या काठी राहणाऱ्या लोकांना कठीण आणि आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागू शकतो.