सूर्यग्रहणाबाबत अंधश्रध्देचा ‘कहर’, जिवंत मुलाला जमिनीत ‘गाडलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 च्या शेवटच्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. देशाच्या अनेक भागामध्ये सूर्य ग्रहणाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र यावेळी काही अजब घटना समोर आल्या आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा येथे जिवंत मुलांना जमिनीत घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशा वेळेस मुलांना जमिनीत घडल्याने दिव्यांग असलेली मुले ठीक होतात अशा प्रकारचा समज येथील लोकांमध्ये आहे त्यातूनच हे कृत्य घडले असल्याचे समजते. या मुलाचे फोटो देखील समोर आले आहेत यामध्ये मुले जमिनीमध्ये घडलेली दिसत आहेत त्याचे मुंडके केवल जमिनीबाहेर असल्याचे समजते.

गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरु झालेले हे ग्रहण दुपारी १.३० वाजल्यानंतर संपणार आहे.

सूर्यग्रहणाबाबत नासाचा इशारा
सूर्यग्रहणाबाबत नासाने इशारा दिला आहे. नासा ने म्हंटले आहे की, सूर्य ग्रहण हे थेट डोळ्यांनी पाहू नका. विकिरणांपासून बचाव होणाऱ्या चष्म्याचा वापर करा.

सूर्यग्रहणाच्या कलावधी 5 तास 36 मिनिटे
भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण सकाळी आठ वाजता सुरु होईल दुपारी 1 वाजून 36 मिनिटानंतर संपूर्ण ग्रहण संपेल.

रिंग प्रमाणे दिसणार हे ग्रहण
या वर्षातील शेवटचे सूर्य ग्रहण एका आगीच्या अंगठीप्रमाणे दिसून येणार आहे. शास्त्रन्य याला ‘रिंग ऑफ फायर’ असे संबोधतात. यामध्ये सूर्याच्या कडा चमकतात आणि मध्यभाग अंधारात दिसतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/