पीएमपीएमएलच्या इमारतीवर सौर हायब्रीड उर्जा प्रकल्प कार्यान्वित

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कमर्शियल इमारत क्र. १ येथील टेरेसवरील जागेत ३५ किलो वॅट क्षमतेचा सौर व पवन उर्जा (हायब्रीड उर्जा प्रकल्प) आजपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीमधून सदर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे . या आधुनिक अपारंपरिक पवन सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आज आमदार माधुरी मिसाळ हस्ते करण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’253e5153-ce1b-11e8-b2ce-3f50aadce05b’]

याबरोबरच पीएमपीएमएल डेपोच्या आवरातील सोलर पॅनल असलेल्या वर्कशॉप शेडचे उद्घाटन देखील करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व संचालिका नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे, पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठाणकर, पुणे महानगर पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका कविता वैराग, राजश्री शिळीमकर आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी बोलताना अनिल शिरोळे म्हणाले की, ‘अपारंपरिक उर्जेचा वापर ही आज काळाची गरज आहे. त्याचा परिणाम भारतावरही होत असून देशातील मोठ्या शहरांचे तापमान गेल्या काही दशकात सरासरी एक अंशाने वाढले आहे. ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. यावरच एक उपाययोजना म्हणून आज या पवन सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन होते आहे, हा या हवामान बदलाशी सामना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याबरोबरच येऊ घातलेले नव तंत्रज्ञान पर्यावरण स्नेही असावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याची सुरूवात केंद्र आणि राज्य पातळींवर झालेली आहे.

सेल्फीसाठी काहीपण : विराटसोबतच्या सेल्फीसाठी त्याने घेतली मैदानात धाव

सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या संस्थांनी पर्यावरणाभिमुख धोरण स्वीकारून वाटचाल करावी, असे मला प्रामाणिकपणे वाटते. पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएलचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही सेवा या दिशेने व्हावा, असा प्रयत्न आपण सारेच करूयात. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या खासदार स्थानिक विकास निधीअंतर्गत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.’ विशेष म्हणजे हा प्रकल्प सौर आणि पवन उर्जा अशा दोन्ही अपारंपारिक स्त्रोतांवर चालणार असून यामधून तब्बल ३५ किलो वॅट उर्जेची निर्मिती होणार आहे.

प्रकल्पाची अधिक माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, ‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामान्य नागरिकांना परवडणारी असावी आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा फायदा घेता यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन आहे. हे साकार करीत असताना संस्था स्वयंनिर्भर व्हावी यासाठी देखील काम करणे महत्त्वाचे आहे. याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही या सौर पवन उर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3be24284-ce1c-11e8-828a-b91fdb13a11e’]

या प्रकल्पातील निर्माण होणारी उर्जा ही प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ तर आहेच याबरोबर इंधन बचत करणारी पर्यायाने वीज बचत करणारी देखील आहे. याशिवाय या ऊर्जेमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये देखील घट होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होते. सदर प्रकल्पामधून निर्माण होणारी उर्जा ही पीएमपीएमएलची कार्यालये, बस थांबे, डेपोमधील कार्यालये, पथदिवे यासाठी वापरण्यात येणार आहे. याबरोबरच नजीकच्या भविष्यात शहरातील १०० बसथांब्यांवर अशा पद्धतीने नागरिकांच्या सोयीसाठी देखील दिवे व शेड लाईट्स बसविण्यात येतील अशी माहितीही यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

सध्या पीएमपीएमएलच्या या एका इमारतीवर खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याबरोबरच लवकरच अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही पीएमपीएमएलच्या मालकीच्या इतर जागांवर देखील उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात असल्याचे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितले तर पीएमपीएमएल कडून आलेल्या सर्व प्रस्तावांना पुणे महानगरपालिका प्राधान्य देईल असे आश्वासन देखील श्रीनाथ भिमाले यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धार्थ शिरोळे यांनी केली सुभाष गायकवाड यांनी आभार मानले.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48ff09d3-ce1c-11e8-aee8-69f02e055861′]