पेट्रोल-डिझेलचे काम सौर उर्जा करेल : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आज जे काम पेट्रोल-डिझेल करत आहे. भविष्यामध्ये ते काम सौरउर्जा करेल, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (आयएसए) पहिल्या अधिवेशनात बोलत होते.

पॅरिस कराराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण आराखडा तयार केलेला आहे. २०३० पर्यंत देशातील ४० टक्के उर्जेची निर्मिती जिवाश्म इंधन विरहीत असेल. त्यावर आपण काम करणे सुरू केले आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. उर्जा साठवून ठेवण्याबरोबरच त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. आपण राष्ट्रीय उर्जा साठवणूक मिशनवरही काम करत आहोत, असेही मोदींनी स्पष्ट केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4faeb074-c6c7-11e8-8477-0f1bcd12d042′]

सौर उर्जा आणि वायु उर्जेसोबतच आपण उर्जेच्या बी ३ स्त्रोतावर सुद्धा काम करत आहोत. आपण आपल्या वाहतुकीची पद्धतीतही बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जैविक इंधन आणि जैविक कचऱ्याचा उपयोग उर्जेच्या निर्मितीसाठी करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02f9e393-c6c8-11e8-bf67-679602388e91′]

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन अखेर मागे

नवी दिल्ली : हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. आम्ही हे आंदोलन आता मागे घेत आहोत, असे जाहिर करत दिल्लीतील शेतकऱ्यांचे आदोलन अखेर मागे घेण्यात आले. हरिद्वार येथून ही किसान क्रांती यात्रा दिल्लीतील किसान घाट येथे आली होती. शेतकऱ्यांनी किसान घाट येथे फुले वाहून आपले आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

[amazon_link asins=’B078124279,B077PWBC7J,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f895851a-c6c7-11e8-ae7a-f1d8ea65cd4f’]

दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेवरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला. दिल्लीत प्रवेश देण्यात येत असल्याचे समजताच रस्त्यांवर झोपलेले शेतकरी जागे झाले आणि त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे कूच केली. रात्री उशिरापर्यंत यूपी गेट आणि लिंक रस्त्यावर ३००० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मते, शेतकऱ्यांनी दगडफेक केली. त्याला उत्तर देताना पोलिसांनी अश्रूधूर सोडला, पाण्याचा मारा, लाठीचार्ज आणि रबराच्या गोळ्याही झाडल्या. ट्रॅक्टरमधील हवा काढण्यात आली. सुमारे अर्धा तास तणावाचे वातावरण होते. यात १०० हून अधिक शेतकरी जखमी झाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’edcb385c-c6c7-11e8-9191-818092ca5731′]