अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून PAK च्या तावडीतून सुटलेल्या चंदू चव्हाण यांचा लष्कराचा राजीनामा (व्हिडिओ)

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानच्या तावडीतून सुटून सुखरुप भारतात परतलेल्या जवान चंदू चव्हाण यांनी लष्कराचा राजीनामा दिला आहे. लष्करातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. चव्हाण यांनी राजीनामा डी.एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.

चंदू चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी म्हटले की, पाकिस्तानमधून सुटून आल्यापासून सैन्य दलातील अनेकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला चांगली वागणूक मिळत नव्हती. पाकिस्तानमधून आल्यापासून सत्त शिक्षा दिली जात होती. शिक्षा दिल्यामुळे खच्चीकरण झाल्याने मला न्याय मिळत नव्हता. या सर्व त्रासाला कंटाळून राजीनामा देत असून मला जर न्याय मिळाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.

चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पकडले होते. चंदू चव्हाण हे 3 महिने 21 दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यावेळी त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. भारत सरकारने अनेक प्रयत्न करून त्यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका केली होती.

visit : Policenama.com