सुट्टीवर आल्यानंतर लग्नाचं आमीष दाखवून जवान ठेवायचा तरुणीसोबत ‘संबंध’, 5 वर्षांनंतर लग्नाला ‘नकार’

गुरदासपूर : वृत्तसंस्था – एका मुलीला एका जवानाने लग्नाचं आमीष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी आणि फसवणूक केल्या प्रकरणी जवान आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बहरामपूर पोलिसांनी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून मूळ जवान आरोपी मात्र फरार आहे.

बहरामपूर ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “बहरामपूर गावातील एका 25 वर्षीय मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ती 2004 साली गुरदासपूरमध्ये फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. यावेळी तिची ओळख आरोपी जवान रमन कुमार सोबत झाली. तो तिब्बडचा रहिवासी आहे. यावेळी रमनने तिला लग्नाचं आमीष दाखवलं. जेव्हा तो सुट्ट्यांसाठी येत असे तेव्हा तिला विविध ठिकाणी बोलावून तिच्यासोबत संबंध ठेवत होता. तब्बल 5 वर्ष हे असंच चालू होतं. जेव्हा त्या मुलीने रमनला लग्नासाठी विचारलं तेव्हा त्याने लग्नाला नकार दिला. आरोपी रमन आणि त्याचे वडिल पवन कुमार यांनी ठरवून मुलीची फसवणूक केली.”

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “आरोपी वडिल पवन कुमार यांना अटक करण्यात आली आहे. तिब्बड येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मुख्य आरोपी रमन कुमार सध्या फरार आहे.” पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/