सैनिकपुत्रांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राखीव जागांवर परप्रांतीयांचे आक्रमण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमात राज्यातील सैनिकांच्या मुलांसाठी राखीव जागा आहेत. मात्र या राखीव जागांवरही आता परप्रांतीयांनी आक्रमण सुरू केले आहे. परप्रांतातील सैनिक आपल्या मुलांकरिता खोटे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) बनवून या जागा बळकावत असल्याचे उघड झाले आहे. अशाच प्रकारे प्रवेश घेतलेल्या पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d337a2a3-a926-11e8-b029-d75f1099e9bd’]

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. प्रवेश यादीतील काही नावांबाबत शंका आल्याने पुण्यातील मनविसेचे विक्रांत भिलारे, राजेंद्र वागसकर आदी कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. पुणे, नाशिक आणि मुंबईतून देण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांच्या अधिवास प्रमाणपत्रांबाबत त्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता त्यापैकी पुण्यात प्रवेश मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाने दिले नसल्याचे पुणे कार्यालयाने स्पष्ट केले. उर्वरित कार्यालयांनी माहिती देण्यास टाळाटाळ चालविली असल्याने खोटे प्रणामपत्र दाखल करून प्रवेश मिळविणाऱ्या काही परप्रांतीय विद्यार्थ्यांना अभय मिळण्याची शक्यता आहे. शासकीय अधिकाऱ्यानी अशा गंभीर घोटाळ्यांना साथ दिल्यास प्रवेशाकरिता इच्छुक असलेल्या राज्यातील मूळ विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, अशी प्रतिक्रिया विक्रांत भिलारे यांनी व्यक्त केली.

मनविसेने हा प्रकार उघड केल्यानंतर राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिता प्रवेश पक्रिया राबविणाऱ्या वैद्यकीय संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दोघाजणांची अधिवास प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने त्यांचे प्रवेश रद्द केल्याचे सांगितले. शिनगारे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासंबंधात त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रमाणपत्रे बोगस असल्याचा अहवाल आल्यानंतर हे प्रवेश रद्द करू. सध्या तरी हा प्रश्न राज्यातील लष्कराच्या सेवेत असलेल्या सैनिकांच्या पाल्यांकरिता राखीव असलेल्या (वर्ग डी२) जागांबाबत निर्माण झाला आहे. माजी सैनिकांच्या मुलांकरिता राखीव असलेल्या डी१ वर्गातही बनावट अधिवास प्रमाणपत्रांचा वापर झाला आहे का याची तपासणी अधिष्ठात्यांमार्फत करण्यात येईल.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e354ff9d-a926-11e8-91c3-77a94a4778a4′]

राज्यातील माजी सैनिकांच्या मुलांसाठी वर्ग डी १ या गटातून प्रवेश दिला जातो. राज्यातील सेवेत असलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी वर्ग डी २ मधून प्रवेश दिला जातो. त्यासाठी २२ जागा राखीव आहेत. देशाच्या अन्य प्रांतातील सैनिकांच्या मुलांसाठी वर्ग डी ३ मधून राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात राखीव जागा आहेत. असे असताना परप्रांतातील सैनिकांच्या मुलांनी खोट्या अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे वर्ग डी २मधून प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे राज्यातील सैनिकांच्या मुलांवर अन्याय झाला आहे.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षांत अशा पद्धतीने राज्यातील ११ भूमीपुत्र सैनिकांच्या मुलांच्या जागांवर परप्रांतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यापैकी पाच प्रकरणे मुंबईतील आहेत. पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरूआहे. त्यांची अधिवास प्रमाणपत्रे बनावट आढळून आल्यास त्यांचे प्रवेश रद्द होतील, शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

इतर बातम्या

राहुल गांधी यांना शासनव्यवस्था समजण्याची बुद्धी नाही : एम जे अकबर 

मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांच्यावर एकाच पिस्तूलातून गाेळ्या झाडल्या