Solution Of Hyperpigmentation | तुमच्या कोणत्या चुकांमुळे कपाळावर पडतात काळे डाग? जाणून घ्या कसा करायचा उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Solution Of Hyperpigmentation | डार्क पॅचेस किंवा हायपरपिग्मेंटेशन (Hyperpigmentation) हे अनेकदा त्वचा खराब होण्याचे लक्षण असते. हे पॅच सहसा मेलेनिनच्या जास्त उत्पादनामुळे होतात. एक टिंट जे त्वचेसाठी एक प्रकारचे संरक्षण म्हणून काम करते. हायपरपिग्मेंटेशन तेव्हा होते जेव्हा त्वचा खूप जास्त मेलेनिन (Melanin) तयार करते, ते जमा झाल्याने डाग आणि पॅच तयार होतात, जे जवळपासच्या त्वचेपेक्षा गडद रंगाचे असतात (Solution Of Hyperpigmentation).

 

अनेक लोकांच्या कपाळावर असे काळे डाग पडतात. या समस्येवर उपाय म्हणून त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जयश्री शरद (Dermatologist Dr Jayshree Sharad) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून उपचार प्रक्रियेबद्दलही (Solution Of Hyperpigmentation) सांगितले आहे.

 

 

डॉ. जयश्री शरद यांच्या मते, कपाळावर हायपरपिग्मेंटेशनची कारणे (Causes Of Hyperpigmentation On The Forehead) :

 

1) सूर्यप्रकाशाचा अति संपर्क : Excessive Exposure To Sunlight
सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क त्वचेसाठी चांगला नाही. यामुळे सनबर्न (Sunburn) होऊ शकते आणि इतर अनेक मार्गांनी त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडण्याची योजना कराल तेव्हा सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.

 

2) रफ टॉवेलचा वापर : Use Of Rough Towel
त्वचा हा शरीराचा बाह्य भाग आहे आणि अतिशय संवेदनशील आहे. चेहरा पुसण्यासाठी टॉवेल (Towel) वापरायची सवय असेल तर काळजी घ्या. खडबडीत टॉवेलमुळे सतत होणारे घर्षण तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते.

3) अ‍ॅकॅन्थोसिस निग्रिकन्स : Acanthosis Nigricans
ही एक त्वचेची स्थिती आहे जी इन्सुलिन रेजिस्टन्समुळे (Insulin Resistance) होते. यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डागही येऊ शकतात.

 

4) बाम : Balm
डोकेदुखीच्या समस्येत बाम नियमितपणे वापरल्यास, त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो, परिणामी कपाळाचा रंग गडद होतो (Solution Of Hyperpigmentation).

 

5) अ‍ॅलर्जी : Allergies
अनेक लोक केसांना रंग देण्यासाठी वेगवेगळे हेअर डाय वापरतात. त्यात रासायनिक घटक (Chemical Component) असल्यास त्वचेची अ‍ॅलर्जी (Skin Allergy) होऊ शकते. इतकंच नाही तर त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले की, परफ्यूम किंवा इतर कोणत्याही सुगंधामुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीमुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग पडू शकतात.

 

डार्क पॅचचा उपचार कसा करावा (How To Treat Dark Patches)

1) हेअर डाय, बाम किंवा परफ्यूम टाळा (Avoid Hair Colours, Balms Or Perfumes) :
जर तुम्हाला कपाळावर काळे डाग पडण्याची समस्या असेल, तर प्रथम हेअर डाय, बाम किंवा परफ्यूम वापरणे थांबवा आणि काही फरक पडतो का ते पहा.

 

2) इन्सुलिनची पातळी तपासा (Check Insulin Level) :
तुमच्या इन्सुलिनच्या पातळीची (Insulin Level) वेळोवेळी तपासणी करून घ्या, कारण हे तुमच्या समस्येचे कारण असू शकते.

 

3) ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन (Broad-spectrum Sunscreen) :
ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणे केव्हाही सुरक्षित असते.

 

4) घाम पुसण्यासाठी मऊ नॅपकीन वापरा (Use A Soft Napkin To Wipe Off The Sweat) :
जर तुम्ही कपाळावरील घाम टिपण्यासाठी सतत खडबडीत नॅपकीन वापरत असाल तर तो बंद करून मऊ नॅपकीन वापरा.

5) ही उत्पादने वापरा (Use These Products) :
व्हिटॅमिन सी (Vitamin C), कोजिक अ‍ॅसिड (Kojic Acid), अल्फा अर्बुटिन (Alpha Arbutin), लिकोरिस (Licorice), एएचएएस (AHAS), रेटिनॉल (Retinol) सारखे घटक असलेली उत्पादने वापरणे अत्यंत उचित आहे.

 

6) त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या (Consult A Dermatologist) :
या उपायांचा उपयोग होत नसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Solution Of Hyperpigmentation | solution of hyperpigment due to which of your mistakes do you get dark spots on your forehead learn how to treat them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Alsi For Diabetes | ‘या’ पदार्थाचे सेवन केले तर Blood Sugar येईल कंट्रोलमध्ये; जाणून घ्या

 

Diabetes | मधुमेहींची शुगर कंट्रोल करते ‘हे’ एक Vitamin, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या