ठेकेदारी कामगारांच्या समस्या सोडवा, आम आदमी पार्टीची मागणी

भद्रावती, पोलीसनामा ऑनलाइन – ठेकेदारी कामगारांच्या समस्या त्वरीत सोडवा अशी मागणी भद्रावती तालुका आम आदमी पार्टीतर्फे भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आज दि.६ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, मोतिलाल फुलमोगरा या सफाई कामगाराला तो प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने ठेकेदाराने १४ दिवस कामावर येण्यास मनाई केली. त्यानंतर अजुनपर्यंत त्याला कामावर घेतले नाही. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झालेला आहे. तसेच सफाई कामगारांना मास्क, हॅन्डक्लोज, ब्रश, फिनाईल देण्यात यावे. या व अन्य इतर मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

यावेळी जिल्हा संघटक परमजित सिंग झगडे, तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, उपाध्यक्ष विनीत निमसरकर, कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, सचिव सुमित हस्तक, सहसचिव नावेद शेख, युवा तालुका अध्यक्ष अभिषेक रंगारी,उपाध्यक्ष साहिल तंगडपल्लीवार,महिला अध्यक्ष अभिषा रंगारी, राजेंद्र भुक्या, मृनाल खोब्रागडे, योगेश शेंडे, आदि कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.