हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवा, अन्यथा आंदोलन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

हिंजवडी, वाकड परिसरात वाहतूक कोंडीही नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे चार तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लवकरात लवकर हिंजवडी, वाकड येथील वाहतूक कोंडी सोडवावी अन्यथा आंदोलन करावे लागले असे निवेदन वंदे मातरम शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगूडे यांनी दिले आहे.

[amazon_link asins=’938803094X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c3ea0b2-907f-11e8-a1ed-3b4fef7a3254′]

संघटनेतर्फे पालकमंत्री गिरीश बापट, हिंजवडी आयटी पार्क कार्यालय आणि हिंजवडी वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज एक, दोन आणि तीन पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हिंजवडी गावठाणमध्ये आयटी पार्कच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ही वाहने भूमकर चौकातून लक्ष्मी चौकाकडे वळविण्यात यावी.

शिवाजी चौक, गणपती मंदिरासमोर खाजगी फेरीवाले गाडे लावतात. त्यामुळे देखील चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या फेरीवाल्यांना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या जागेत बसण्यास परवानगी दयावी. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. हिंजवडीचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी खुला ठेवण्यात यावा. वाहतूक विभागाने हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.