मराठा आंदोलन प्रकरणी शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवू : गृहराज्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन

राज्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका न घेता शांतता राखण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

आपण आरक्षणासंबंधीची मागणी शांततापूर्ण प्रक्रियेद्वारे सोडवू शकतो असे ते म्हणाले. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात १५ लाख वारकरी दाखल झाले आहेत. त्यांना घराच्या वाटेवर कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
[amazon_link asins=’B07F9VVDCR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cb8370b-8f3a-11e8-afe4-4bebb0e76bcd’]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप  करीत मराठा मोर्चाच्या आयोजकांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील  वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे पुण्याहून औरंगाबाद येथे सोडण्यात येणाऱ्या एसटी रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र बंद दरम्यान वारकरी आणि रुग्णवाहिकांना लक्ष्य करु नये, असे आवाहन मराठा संघटनांतर्फे करण्यात आले आहे. मात्र, तरीही लोक आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे गंगापूरमधील गोदावरी नदीवरील पुलावर आंदोलन सुरु असून याच पुलावरुन सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारली होती.
[amazon_link asins=’B07B6GSKKH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d13fda1-8f3a-11e8-abb1-97c597a1a034′]
त्याचबरोबर सांगली महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मंगळवारी शहरात आंदोलन करण्यात येणार नाही, असे सकल मराठा मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले तर दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. पुण्यातही आंदोलकांनी दुकाने बंद पाडली. तर हिंगोलीजवळ आंदोलकांनी पोलिसांची एक गाडी जाळली. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग आंदोलकांनी सकाळी रोखून धरला.