‘फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन आले का ?’ : नरेंद्र मोदींचे भाऊ 

पिंपरी : पोलीसनामा आॅनलाईन – ‘फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन येतील का?’ असं म्हणत सोमभाई मोदी यांनी मोदींची पाठराखण केली आहे. देशात महागाई आणि इंधन दरात वाढ होत असल्याने विरोधकांनी ‘अच्छे दिन’वरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच मोदींचे भाऊ सोमभाई मोदी यांनी भावाची पाठराखण केली आहे. फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा, मेहनत करा, शिक्षण घ्या असे त्यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b01f9e4c-d149-11e8-9468-29f2f8bef97f’]

सोमभाई मोदी हे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी चऱ्होली येथील साई मंदिरात मंगळवारी दर्शनासाठी आले होते. पत्रकारांनी अच्छे दिन आले का?, असा प्रश्न विचारताच सोमभाई मोदी म्हणाले, फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन येतील का? यासाठी काम करा, मेहनत करा, शिक्षण घ्या यासाठी मेडिकल कॉलेज विद्यापीठ बनवलेले आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेताना अडचणी होत्या त्या सोडवण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b968541a-d149-11e8-8ff0-49d3da2e8a11′]

लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पालक जबाबदार आहेत. असं म्हणत त्यांनी लहान मुलांवरील अत्याचारासाठी सोमभाई मोदी यांनी पालकांना जबाबदार ठरवले. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. जेणेकरून मोठे झाल्यानंतर ते काही चुकीचं काम करणार नाही. असं त्यांचं म्हणणं होतं. मुलगी बाहेर गेली तर मुलीला विचारले जाते मात्र मुलांना पालक प्रश्न  विचारत नाहीत असं देखील त्यांनी सांगितले.

फिल्मी स्टाईलने मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

गुजरातमधील वाडनगर येथे राहणारे सोमभाई मोदी यांनी नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी गुजरातसाठी मोलाचे कार्य केले असे म्हणत, सोमभाई मोदी यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या कामाची स्तुती केली.

जाहिरात