वाघोलीत काही डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट साठी पैसे आकारून परप्रांतीयांची केली लूट ?

वाघोली – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्तींना गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून ‘फिटनेस सर्टिफिकेट ‘ ची मागणी केली जात होती. लोकांच्या या असहाय्यतेचा गैरफायदा उचलत वाघोली मध्ये काही खाजगी दवाखान्यात ‘फिटनेस सर्टिफिकेट’साठी डॉक्‍टरांकडून पैसे आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे आहेत. अशा डॉक्‍टरांवर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवास करण्याची सशर्त परवानगी देऊन सरकारने दिलासा दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अडकलेले परप्रांतीय, कामगार, विद्यार्थी मोठ्या संख्येने आपापल्या गावी निघाले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची सोय देखील केली आहे. सरकारने पुण्यातून गावी जाणाऱ्यांसाठी मात्र ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य केले होते . हे फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लोकांना दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते.ही गरज लक्षात घेऊन ‘फिटनेस सर्टिफिकेट’साठी पुण्याजवळील वाघोलीत लोकांना अक्षरशः लुटण्यात येत होते.

एकीकडे कोरोना च्या संकटामुळे उपासमारीची वेळ आणलेल्या या गरीब लोकांकडून शारीरिक तपासणीच्या नावाखाली तास तास उभे केले जात होते तर दुसरीकडे खाजगी डाॕक्टराकडून तपासणीसाठी 200 ते दोन हजार रुपये आकारले जात होते .त्यामुळे अश्या खाजगी डाॕक्टरावर आरोग्य विभाग काय कारवाई करणार हा ही प्रश्नच आहे

रेल्वेत प्रवेश करण्याआधी प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मग वेगळ्या ‘फिटनेस सर्टिफिकेट’ची गरज काय असा प्रश्न उपस्थित होतय. लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक कुचंबना झाली आहे, त्यात त्यांना सर्टिफिकेटची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचेही बोलले जात होते .

आरएमपी रजिस्टेशन डाॕक्टराकडून सर्टिफिकेट देण्याचे अधिकार होते .परंतु शासकीय आदेशात कुठूलेही शुल्काबाबतीत काहीच उल्लेख नव्हता.झालेल्या प्रकाराची तपासकरुन माहिती घेऊ.

हवेली वैद्यकीय अधिकारी डाॕ.खरात

वाघोली मध्ये खाजगी डाॕक्टरांकडून कोणत्याही तपासणी न करता फक्त आधार कार्ड वरील माहिती नुसार माहिती घेउन अवाढव्य रक्कम घेउन फिटनेस सर्टिफिकेट दिले गेल्या बाबतीत अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत.मी या बाबतीत खाञी केली असता ही वस्तुस्थिती खरी होती.आपला भाग कंटेनमेंट झोन असतानाही काही डाॕक्टरांनी शासकीय नियमांचे पालन न करता हा प्रकार केला आहे हे आताच्या परिस्थिती खुप गंभीर आहे.

डाॕ.विनोद सातव (संस्थापक कार्याध्यक्ष वाघोली डाॕक्टर असोशिसन)