Video : उद्योगपती हर्ष गोएंका यांनी केला ‘खतरनाक’ विमान लँडिंगचा व्हिडीओ ट्विट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – वंदे भारत या मोहिमेंतर्गत कोरोनामुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझिकोडच्या करीपुर विमानतळावर उतरताना धावपट्टीवर घसरुन ३५ फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे होऊन दोन्ही वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जगभरात अनेक ठिकाणी विमान लँड होताना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे गेल्याचं आपण पाहिलं आहे. अपघाताची कारणे वेगवगेळी असतात. अशा अडचणीच्या वेळी वैमानिक आपले कौशल्य पणाला लावत विमान सुरक्षित लँडींग करताना दिसतात. असाच एक २ मिनिटे ६ सेकंदाचा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केला आहे. या व्हिडिओत विमानांचे खतरनाक लँडींग पाहून मनात धडकी भरायला लागते. मात्र, असे खतरनाक लँडींग होऊन सुद्धा विमान दुर्घटना झालेली नाही. वैमानिकाला विमान सुरक्षित लँड करण्यात यश आल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.