पुण्यातील पूर परिस्थितीत ‘थोडीशी’ सुधारणा, 4 पुल वाहतूकीस बंदच ; मुळशी, पवनाचा विसर्ग झाला कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टेमघरसह चारही धरणे भरली असून खडकवासला धरणातून अजूनही ४५ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पूर परिस्थिती अद्याप कायम आहे. दुसरीकडे पवना व मुळशी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाल्याने औंध व पिंपरी चिंचवड परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. शहरातील चार पुल वाहतूकीसाठी अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत.

औंध येथील राजीव गांधी पुल, स्पायसर कॉलेज पुल तसेच शिवाजीनगरमधील जयंतराव टिळक पुल आणि डेक्कन येथील बाबा भिडे पुल बंद ठेवण्यात आले आहेत.

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण काल भरुन वाहू लागले होते. आज टेमघर धरणही भरले असून त्यातून ५४९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. वरसगावातून ३ हजार ४१२ क्युसेक तर पानशेतमधून ९ हजार ८९२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी असल्याने खडकवासला धरणातून अजूनही ४५ हजार ४७४ क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पूर परिस्थिती अद्याप कायम आहे.

मुळशी धरणातून सोमवारी ३२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे औंध बोपोडीसह सर्वत्र पूर आला होता. आता मुळशी धरणातून हे प्रमाण कमी करुन १८ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आले आहेत तर, पवना धरणातून ८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने पूराचे पाणी ओसण्यास सुरुवात झाली आहे.

असे असले तरी बंडगार्डन येथून सध्या १ लाख १८ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. दौंड येथून १ लाख ५८ हजार क्युसेक पाणी उजनीच्या जलाशयात मिसळत आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा ८७ टक्के भरले आहे. धरणातून नदीत १० हजार क्युसेक तर डाव्या कालव्यातून ३ हजार क्युसेक तर पॉवर हाऊससाठी १६०० आणि बंद जलवाहिनीतून १२०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

वीर धरणातून सध्या ९९ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे़ त्यामुळे निरा नरसिंगपूर येथील संगमावरुन ३ लाख १९ हजार क्युसेक पाणी वाहत आहे़ पंढरपूर येथे सध्या नदीतून ३ लाख २४ हजार क्युसेक पाणी वाहत आहे. ्पुणे शहरात सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. सोमवारी सकाळपर्यंत ४१ मिमी पाऊस पडला होता. मंगळवार सकाळपर्यंत २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –