‘काळे’, ‘लांब’, ‘दाट’ आणि ‘सुंदर’ केस हवेत तर मग ‘या’ 7 चुका करणं टाळा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – महिला असो अथवा पुरुष प्रत्येक व्यक्ती आपल्या केसांवर प्रेम करते. केस काळे, लांब आणि सुंदर आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण कळत नकळत आपण अशा काही चुका करतो, त्यामुळे केस डॅमेज होतात. या चुका जर टाळाल तर केस चांगले रहातील. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत माहिती सांगणार आहोत.

१. जास्त कंडिशनरचा वापर

लोक आपले केस सॉफ्ट होण्यासाठी जास्त कंडीशनरचा वापर करतात. मात्र, असे नाही. केसांची लांबी आणि केस कसे आहेत त्यानुसार कंडीशनरचा वापर करावा. तसेच आणखी एक चूक लोक करतात. ती म्हणजे शॅम्पूप्रमाणे कंडीशनर चा वापर. म्हणजे केसांच्या मुळात पण कंडीशनर केसांना लावायचं असत.

२. चुकीचा शॅम्पू वापरणे

तुमच्या डोक्याची त्वचा ड्राय किंवा ऑयली असेल, तुमचे केस ड्राय किंवा ऑयली असतील अथवा तुम्हाला डॅंड्रफची समस्या जाणवत असेल तर योग्य शॅम्पू ची निवड केली पाहिजे. त्यासाठी सतत शॅम्पू बदलू नये.

३. सातत्याने कंगवा फिरवणे

रोज केसांमध्ये १०० स्ट्रोक्स असायला पाहिजे, असे मानलं जात. मात्र तुम्ही कंगवा कसा फिरवता यावर ते अवलंबून आहे. कारण ड्राय केसांमध्ये सातत्याने कंगवा फिरवल्याने केस तुटतात. तसेच केसांच्या मुळातही घर्षण जास्त होत असते. ज्यामुळे केस डॅमेज होतात.

४. केस ट्रीम न करणे

लूक चांगला करण्यासाठी तसेच दोन तोंड असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ट्रीम केलं पाहिजे. केसांना दोन तोंड असेल तर त्यांचा विकास खुंटतो. म्हणून नियमित केस ट्रीम करा.

५. अति केमिकल वापर

जेवढे केस नॅच्युरली चांगले ठेवाल तेवढं चांगले असते. सतत केमिकल उपचार करत रहाल तर केस डॅमेज होतात. म्हणून केसांवर नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करा.

६. स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा जास्त वापर

अनेकजण केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा वापर करतात. त्यामुळे केस फार जास्त डॅमेज होतात. केस गळती आणि तुटण्याची समस्या उद्भवते.

७. झोपताना केस घट्ट बांधणे

अनेक महिला रात्री झोपताना केस घट्ट बांधतात. ही पद्धत चुकीची आहे. अशाप्रकारे केस बांधल्याने केस तुटू शकतात.