‘Duty’ चा बहाणा करून हॉटेलमध्ये जायची पत्नी, पतीला कळताच घडले असे काही…

चंदीगड : वृत्तसंस्था – पंचकुला येथील मोरनी परिसरातील हॉटेलच्या मागे एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. इस्लामचा खून इतर कोणी नाही तर त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेचा खुलासा कॉल डिटेल,मोबाईल लोकेशन,आणि महिलेच्या बांगड्यांवरून झाला आहे.
असा केला पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीचा खून…. 
या प्रकरणाचा खुलासा करतांना चंडीमंदिर पोलिस ठाण्याचे प्रभारी नवीन कुमार यांनी माहिती दिली की, आरोपी पत्नीला आम्ही अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी देखील सुरू आहे. इस्लामची पत्नी श्यामा प्रवीण ही पतीच्या तुटपुंज्या कमाईवर खुश नव्हती त्यामुळे ती पीजीआयमध्ये दररोज कामाला जाते असे आपल्या पतिला सांगत होती. घटनेच्या दिवशी देखील तिने डयुटीवर जाण्याचा बहाणा केला आणि ती घरात वाद घालून  प्रियकराच्या गाडीवर बसून मोरनीच्या परिसरमधील एका हॉटेलमध्ये गेली. प्रवीणने आपल्या प्रियकरासोबत पतीचा काटा काढण्याचा कट रचला आणि पतिला कॉल करून बोलावून घेतले. परपुरुषासोबत पत्नीला पाहून पतीने तिला कानशिलात लगावली. तेवढ्यात तिच्या प्रियकराने आणि तिने त्याचा गळा दाबला त्यात तिच्या बांगड्या फुटल्या त्याने देखील दोघांना जोर लावला त्याचा प्रतिकार पाहून महिलेच्या प्रियकराने त्याच्या डोक्यात दगड मारला आणि त्याला खाली पाडले खाली पडताच त्याचा चेहरा दोघांनी मिळून दगडाने ठेचला आणि त्याला ठार केले.
मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी घेतला मागोवा…
पत्नीच्या बांगड्या फुटल्याने तिच्या हातावर इजा झाली होती. काही खुणाही होत्या. त्यानंतर तिचे कॉल डिटेल आणि मोबाईल लोकेशन चेक केले असता  ती नारायणगड परिसरात नसल्याचे आढळले. पोलिसांचा संशय बळावताच पत्नीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.