आमच्या काही नेत्यांनी ‘वाढीव’ न बोलण्याची गरज : नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाचे नेतृत्व दिले पाहिजे असे मत एका नेत्याने व्यक्त केले होते.आता नितीन गडकरी यांनी मात्र आमच्या पक्षातील काही नेत्यांना कमी बोलण्याची गरज आहे असे परखड मात व्यक्त केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण काय बोलतो याचे भान पक्षातील नेत्यांनी ठेवायला पाहिजे असे गडकरी म्हणाले. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान बोलत होते.
आमच्या पक्षातील काही नेत्यांचे ‘बॉम्बे टू गोवा’ सारखे 
आमच्या पक्षातील काहीच लोकांना माध्यमांशी बोलायची  भलतीच आवड आहे. त्यांना पत्रकारांशी बोलायला फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे. याबाबत बोलताना नितीन गडकरी यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील एका प्रसंगाचे उदाहरण दिले. ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. या चित्रपटात आपल्या मुलाची सतत खायची सवय मोडण्यासाठी पालक त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात, असे दृश्य आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांचे असेच झाले आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. राफेल विषयी भाजपाकडून ७० पत्राकार परिषद घेण्यात आल्या होत्या याबाबत वैचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
माध्यमांशी मी कमीच बोलतो : गडकरी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी कोणत्याही कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)च्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. जेपीसी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही मत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मोदीच होतील पुन्हा पंतप्रधान 
सध्या देशात महाआघाडीची मोठी चर्चा सुरु आहे याबाबत ते म्हणाले की, ही कमजोरांची महाआघाडी आहे, १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी सामूहिक विपक्षांचा सामना करत एकहाती सत्ता मिळवली होती. त्याप्रमाणेच मोदी पुन्हा एकदा विजयी होतील. कमजोर आणि पराभूत झालेल्या लोकांची ही आघाडी आहे. जे एकमेंकाचा सन्मान करत नाहीत.
भाजप – शिवसेना म्हणजे तुझं माझं जमेना , तुझ्या वाचून करमेना’ 
सध्या भाजप आणि शिवसेना युतीवरून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले की , भाजप आणि शिवसेना  म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तूझ्यावाचून करमेना ‘ असे आहे. दोन्ही पक्षांमध्ये  वाजपेयी असताना जसे संबंध होते तसेच आताही आहेत. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे गडकरी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे असेही गडकरी म्हणाले.
You might also like