घरात काही वस्तूंचा अतिवापर टाळणेच योग्य

पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ँटी-बॅक्टेरिअल हॅन्डवॉश, मस्कीटो कॉइल, स्टायरोफोमचे ग्लास किंवा प्लेट, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स, अगरबत्ती आणि धूपबत्ती, एअर फ्रेशनर अशा वस्तूंचा दैनंदिन जीवनात आपण रोज वापर करतो. यातील अनेक वस्तू आपण सुविधेसाठी तर काही लाइफस्टाइल मेंटेनसाठी आणि काही स्वच्छतेसाठी वापरतो. पण या वस्तूंचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो.

अ‍ँटी-बॅक्टेरिअल हॅन्डवॉशच्या तुलनेत सामान्य साबण जास्त चांगले असतात. अ‍ँटी-बॅक्टेरिअल साबणात टड्ढायक्लोसन नावाचं केमिकल असतं. जे बॅक्टेरियाला नष्ट करणारं आणि अ‍ँटी-फंगल एलिमेंट असतं. पण याचा जास्त वापर केल्याने आरोग्याचं नुकसान होतं. मस्कीटो कॉइल डास दूर जात असतील पण याने आरोग्याचं नुकसान होतं. एका कॉइलमधून जितका धूर निघतो तो ७५ ते १३७ सिगारेटींच्या बरोबरीत असतो. अनेकदा घरात पार्टी किंवा लग्न असेल तेव्हा स्टायरोफोमचे ग्लास किंवा प्लेट वापरल्या जातात. स्टायरोफोममध्ये स्टाइरिन नावाचं केमिकल असतं, ज्याने कॅन्सर होण्याचा होण्याचा धोका असतो. अशात या प्रॉडक्टचा वापर करणे बंद करायला हवे.

कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये किती केमिकल असतात हे काही कुणापासून लपलेलं नाही. तसेच या प्रॉडक्ट्सचा वापर पूर्णपणे बंद करा असंही म्हणता येणार नाही कारण तसं होणारही नाही. पण याचा वापर कमी नक्कीच केला जाऊ शकतो. कारण अनेक कंपन्या हा दावा करताता की, त्यांच्या प्रॉडक्टमध्य केमिकल नाहीत. पण हे खरं नाही. यांचा फार जास्त वापर केल्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.

कॉस्मेटिकचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. पूजेदरम्यान वापरली जाणारी अगरबत्ती आणि धूपबत्तीमुळे घरात किंवा कुठेही सुगंध भलेही चांगला येत असेल. पण याने तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात. एका रिसर्चनुसार, यामुळे श्वासाची समस्या ते कॅन्सरचा धोका असतो. याचं यात वापरलेले वेगवेगळे केमिकल्स असतात. एअर फ्रेशनरच्या जास्त वापरामुळे तारपीन आमि एथिलीन ग्लायकोलची समस्या होते. हे तत्व श्वासाद्वारे शरीरात जातात आणि याने वेगवेगळ्या समस्या होतात.