फटाक्यांनी खेळली जाणार ‘होळी’, बाजारात आले असे काही खास प्रकारचे ‘रंग’ अन् ‘पिचकार्‍या’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काही दिवसांनीच होळीचा सण येणार आहे, त्यामुळे बाजारात विविध रंगांची दुकाने सजू लागली आहेत. या वेळी दुकानांमध्ये पाणी वाचवण्याच्या पार्श्वभूमीवर रंगांना बाजारात आणण्यात आले आहे. यावेळी पहिल्यांदाच रंगांच्या फटाक्यांनी होळी खेळली जाणार आहे.

सर्वसाधारणपणे दिवाळीला फटाके फोडले जातात. परंतु यावेळेस होळी सणाच्या निमित्ताने बाजारात गुलाल फटाका आला आहे. पहिल्यांदा अशा प्रकारचा फटाका बाजारात आल्याने तो लोकांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या फटाक्यातून आवाजासोबत विविध रंगांची उधळण देखील होणार आहे. या वेळेस होळीला दुकानदारांनी पाणी वाचवण्याऱ्या रंगांना बाजारात आणले आहे.

सामान्यतः पिचकारी मध्ये पाणी आणि रंग मिसळून होळी खेळली जात असते. परंतु यावेळेस आपण पाण्याच्या पिचकारीत गुलाल भरून होळी खेळू शकतो. डिओ स्वरूपात कलर स्प्रे देखील बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. अग्निशामक उपकरणे देखील विविधतेसह सादर करण्यात येत आहेत. या अग्निशामक यंत्रामधून आग विझवण्याचे केमिकल नाही तर होळीचे रंग बाहेर येत आहेत आणि हा रंग आपल्या कपड्यांना आणि आपल्या शरीराला इजा करीत नाही.

तसेच लोकांना आकर्षित करण्यासाठी स्पायडर मॅन आणि टॉम अ‍ॅड जेरी सारख्या कार्टून फॉर्मसारखे वेगवेगळे मुखवटे बाजारात विकण्यासाठी आणले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साह भरलेला आहे. लोकांनाही वाटत आहे की यावेळी होळी दरवर्षीपेक्षा वेगळी आणि खास असेल.