‘हे’ उपाय करा आणि मिळवा पिळदार ‘शरीरयष्टी’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आजच्या युवक पिळदार शरीरयष्टीसाठी अनेक उपाय करत असतात. अशा या पिळदार शरीरयष्टीमूळे व्यक्तिमत्व प्रभावी दिसते. यासाठी युवक तासनतास जिममध्ये वेळ घालत असतात. जिम मध्ये व्यायामासोबतच काही लोक मसल्स वाढविण्यासाठी गोळ्या घेतात. तर कधी अंमली पदार्थ घेऊन व्यायाम करतात. कालांतराने याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊ भारदस्त शरीरयष्टीसाठी काही आवश्यक टिप्स.

– पिळदार शरीरयष्टीसाठी आहार अत्यंत महत्वाचा आहे. अशा शरीरासाठी जास्त मात्रात प्रोटीनची गरज असते. प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन, मिनरल आणि कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. अशा या घटकांची मात्रा शरीरात वाढवण्यासाठी नियमित फळ, डाळी, मासे, दूध यांचा सेवन करावा.

– पाण्यामुळे शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होते. तर रोज भरपूर पाणी प्यावे.

– व्यायाम करताना कधीही थेट व्यायामाला सुरुवात करू नये. व्यायाम करण्याआधी प्रथमता वार्म अप करावे. यामुळे बॉडी लवचिक होते आणि यामुळे योग्यरितीने व्यायाम करता येतो.

– वार्मअपनंतर स्ट्रेचिंग करणे लाभदायक असते. स्ट्रेचिंग केल्याने स्नायू व्यायामासाठी सक्रिय होतात. स्ट्रेचिंग करताना स्नायू थोडे ताणावे. पण लक्षात ठेवा स्नायूला ताण देताना घाई करू नये.

– व्यायामसोबतच पोहणे, सायकल चालवणे, धावणे फायद्याचे ठरते.

आरोग्यविषयक वृत्त –