मलेरिया ठरू शकतो जीवघेणा

पोलीसनामा ऑनलाइन – युनिसेफच्या आकडेवारीनुसार जगभरात सुमारे १२०० मुले रोज मलेरियाने मृत्युमुखी पडतात. मलेरिया योग्य उपचार केल्यास बरा होऊ शकतो. मात्र दुर्लक्ष केल्यास हा धोकादायक आजार ठरू शकतो. या आजाराच्या लक्षणांची माहिती करून घेतली पाहिजे. अ‍ॅनोफिलिस डासाची मादी चावल्याने त्याच्याद्वारे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो.

मलेरियाचे ताप हे प्रमुख लक्षण मानले जाते. या आजाराला दूर ठेवायचे असल्यास आजूबाजूची डबकी बुजवली पाहिजेत. जणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही. या आजारात तीव्र डोकेदुखी जाणवत तसेच थंडी-ताप भरून येतो. डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करून नये. वेळीच डॉक्टरकडे जाऊन मलेरियाची तपासणी करावी. मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. मलेरियाचे नेमके निदान करता येते. मलेरियामुळे आरोग्याचे नुकसान होण्यापूर्वी डॉक्टरांकडे जावे. मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळते. तसेच अंगदुखी, खोकला ही लक्षणेही आढळतात.

मलेरिया होण्याचे मुख्य कारण म्हणजे डासांचा प्रादुर्भाव होय. घर व घराजवळील परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. काही नैसर्गिक उपायांनीच डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी सजग राहायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मलेरियाचे निदान करण्याची प्रणाली कमकुवत आहे. जगभरातल्या मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात असून १०० पैकी फक्त ८ रुग्णांचेच निदान होते. जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे १५ देशांत आहेत. या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे.

नैसर्गिकरित्या डासांना दूर ठेवण्याचे काम निलगिरी व लिंबाचे तेल करते. या तेलामधील सिनिओलच्या घटकांमुळे त्वचेचे रक्षण होते. यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. याचबरोबर कापूरदेखील उपयुक्त मानला जातो. घरातील दारं-खिडक्या बंद करून कापूर जाळल्यास त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू दिल्यास डास पळून जाण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी धूप करताना त्यात कापूर टाकला तरीही डास दूर होतात. तुळशीने अळ्या मारण्यास अत्यंत प्रभावी असल्याने ती डासांना दूर ठेवण्यास मदत करते. अशाच प्रकारे घराभोवती तुळस, पुदिना, गोंडा, गवतीचहा यासारखी झाडे लावल्यास नैसर्गिकरित्याच डासांपासून रक्षण होते.