सोमेश्वर कारखान्याचा रविवारी 59 वा बाँयलर अग्निप्रदिपन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या ५९ व्या को- जन बाँयलर अग्नि प्रदिपन समारंभ रविवारी (दि.४) सकाळी साडे नऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर पार पडणार आहे.

सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी पुरूषोत्तम जगताप यांंच्या हस्ते अग्नि प्रदिपन समारंभ पार पडणार आहे. सद्या कोविडचा प्रादुर्भाव असल्याने हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्यात पार पडणार आहे.

दर वर्षी आपण सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत असतो परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वांनाच उपस्थित राहणे शक्य नसले तरी आपल्या शुभेच्छा नेहमी कारखान्यासोबत राहतील असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन शैलेंंद्र रासकर व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी म्हटले आहे.