सोमेश्वर साखर कारखाना राज्यात सर्वोच्च ऊसदर देणार : चेअरमन पुरुषोत्तम जगताप

नीरा : पोलीसनामा आँँनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ च्या गाळप हंगामात कारखान्याने एकूण १० लाख ४ हजार ३८८ मे. टन ऊसाचे गाळप केले असून पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा १२.१८ टक्केचा साखर उतारा राखला आहे. १२ लाख २४ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून कारखाण्याचा सन २०१८-१९ चा गाळप हंगाम सर्वच बाबतीत आज अखेरचा ऐतिहासिक गाळप हंगाम झाला असून उस दरातही कारखाना अंतिम दर ३ हजार ३०० रुपये सर्वोच्च ऊसदर देणार असल्याची माहिती सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, सोमेश्वरची सन २०१८-१९ या हंगामाची २ हजार ७७४ रुपये मे.प्रतिटन इतकी एफ.आर.पी असून आज अखेर कारखान्याने २ हजार ८२४ रुपये सभासदांना अदा केले असून उर्वरित ४७६ पैकी दुसरा १०० रुपयाचा हप्ता माहे सप्टेंबर मध्ये सभासदांना अदा करणार आहोत. ३ हजार ३०० प्रति मे. टन ऊसदर जाहीर करणारा सोमेश्वर राज्यातील पहिलाच कारखाना असून कारखान्याचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांच्या मुळे व कारखान्याचे सभासद, अधिकारी, कामगार, उसतोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्वरची घोडदौड यशस्वीरित्या सुरु आहे.

सर्वांच्या सहकार्यामुळेच शुगर प्लांट, कोजनरेशन व डिस्टीलरी हे सर्वच प्रकल्प पूर्ण क्षमतेने चांगल्या पद्धतीने चालल्यामुळे त्यामधून आपल्याला दर्जेदार उत्पादन घेता आले व त्यामधल्या नफ्यातूनच आपण सर्वोच्च दराचा निर्णय घेतला असल्याचे सांगून जगताप पुढे म्हणाले कि, ३ हजार ३०० रु. प्रति मे. टन उसदर जाहीर करीत असताना येणाऱ्या हंगामातही संचालक मंडळ उसदरात व कारखान्याच्या सर्वच बाबतीत सर्वोच्च स्थानी राहण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास हि चेअरमन जगताप यांनी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like