सई ताम्हणकर फॅन्सला मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत, अभिनेत्रीनं Insta पोस्टनं वेधलं लक्ष

पोलिसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या स्टाईल आणि लुकमुळे ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. असेच काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो व्हायरल झाल्यानं सई काही दिवसांपूर्वी सोशलवर चर्चेत आली होती. सोशलच्या माध्यामातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. पुन्हा एकदा आपल्या काही पोस्टमुळं सईनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सईनं तिच्या इंस्टावरून एक पोस्टर शेअर केलं आहे. लवकरच काही नवीन तुमच्या भेटीला येणार असल्याचं तिनं या पोस्टमधून सांगितलं आहे. परंतु ते नेमकं काय आहे याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जाताना दिसत आहेत.

याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये तिनं काहीही न लिहिता फक्त ब्लॅँक पोस्ट शेअर केली आहे. यात पिंक कलरचं बॅकग्राऊंड दिसत आहे. आता या पोस्टचा नेमका अर्थ काय असाही प्रश्न सर्वांना पडला आहे. सई चाहत्यांना लवकरच काही सरप्राईज देणार आहे हे मात्र नक्की आहे. येणाऱ्या काळात त्याचाही उलगडा होईलच.

https://www.instagram.com/p/CGSJQhonOzy/?utm_source=ig_embed

सईच्या वर्कफ्रंबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कृती सेनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका असणार आहेत. हा सिनेमा मराठीतील मला आई व्हायचंय या सिनेमावर आधारीत आहे. सईने दुनियादारी, बालक पालक, वजनदार अशा अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. हंटर, गजनी अशा हिंदी सिनेमातही तिनं भूमिका साकारली आहे.

You might also like