संपुर्ण प्रवासादरम्यान रेल्वेत बसलेल्या युवतीकडे पाहून ‘हे’ काम करत राहिला युवक, जेव्हा ट्रेनमधून खाली उतरला…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – शामलीमध्ये एका रेल्वेत एका तरुणीचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी भवन क्षेत्रातील रहिवासी एक युवती दिल्लीतून येणाऱ्या रेल्वेत प्रवास करत होती. या दरम्यान ती रेल्वेत खाली बसली आणि तिच्या वरील सीटावर शामली भागातील एका गावातील तरुण बसला होता, जो गाजियाबादच्या लोनी परिसरातील होता.

या प्रकरणी या तरुणावर आरोप लावण्यात आला आहे की खाली बसलेल्या तरुणीचा तो व्हिडिओ चित्रित करत होता. या दरम्यान मुलगी काहीही बोलली नाही परंतू जशी रेल्वे शामील रेल्वे स्थानकात पोहचली आणि तरुण उतरु लागला तेव्हा तरुणीने त्याला मागून पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांची त्याठिकाणी गर्दी झाली. जेव्हा लोकांना या प्रकरणाची माहिती तरुणीने दिली तेव्हा जमावाकडून तरुणाला मारहाण करण्यात आली.

तरुणाला या मारहाणीतून काही लोकांना वाचवले आणि त्याच्या फोनमधील व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी तरुणीकडून करण्यात आली. ज्यानंतर प्रकरण निवळले. तरुणीने देखील कोणत्याही कायदेशीर कारवाई शिवाय रेल्वे सोडली. या प्रकरणी माहिती देताना ठाणे प्रभारी अभिनव प्रताप यांनी सांगितले की या प्रकरणी कोणतीही तक्रार मिळाली नाही.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like