‘काहीतरी घडतंय..बिघडतंय…कोण राजिनामा देतंय…कोण पक्ष सोडून जातंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे नुकतेच समोर आले आहे. दरम्यान याबाबत कोणालाही काहीच कल्पना नव्हती असे समजत आहे. अशात आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटर अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट केलं आहे. अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्यावरून शेलारांनी खोचक टीका केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, “काहीतरी घडतंय..बिघडतंय…कोण राजिनामा देतंय…कोण पक्ष सोडून जातंय…देशात आणि राज्यात पारदर्शक राज्य कारभार सुरु होताच…झाकलेलं बरंच उघडं पडतंय. सिंचनाचं मुरलेलं पाणी हळूहळू बघा आता मोठ्या मोठ्या धरणातून कसं कसं बाहेर पडतंय! काहीतरी घडतंय काहीतरी “बि”घडतंय?” अशी जहरी टीका शेलार यांनी केली आहे.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट देण्याची खेळी संपत नाही तोच राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाले. परंतु अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बगाडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अजित पवार यांनी दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली असल्याचेही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बगाडे यांनी सांगितले.