ADV

Somwar Peth Pune Crime News | पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची 45 लाख 54 हजारांची फसवणूक, 8 जणावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Somwar Peth Pune Crime News | पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात (Pune District Security Guard Board) काम करत असल्याचे भासवून मंडळाच्या बँक खात्यातून 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्स्फर करुन घेत फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 8 सप्टेंबर 2022 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सोमवार पेठेतील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Somwar Peth Pune Crime News)

याबाबत जिल्हा सुरक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत हरि चोभे (वय-44 रा. पुणे-नाशिक हायवे, भोसरी, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजय शिवाजी ठोंबरे (वय-30 रा. स्नेह नगर, परळी वैजनाथ, जि. बीड), केशव दत्तु राठोड (वय-22 रा. पुणे), विकास चंदर आडे (वय-33), पवन प्रमदास पवार (वय-26), मोकाश रतन राठोड (वय- 26 तिघे रा. वडगाव शेरी, पुणे), मिथुन शिवाजी राठोड (वय-31 रा. दहिफळ ता. मंठा, जि. जालना), योगेश संभाजी मोडाले, लखन देवीदास परळीकर यांच्यावर आयपीसी 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत चोभे हे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे सचिव पदावर कार्यरत
असून मंडळाचे सोमवार पेठेत कार्यालय आहे. आरोपी अजय ठोंबरे हा ब्रिक्स फॅसिलीटी प्रा. लि. यांच्या मार्फत पुणे
जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात क्लार्क म्हणून कामाला होता. ठोंबरे मंडळात काम करत असताना व इतर आरोपी हे सुरक्षा रक्षक मंडळात कामाला नसताना त्यांनी मंडळात काम करत असल्याचे भासवले. आरोपींनी मंडळाच्या बँक ऑफ इंडिया पुणे शाखातील बँक खात्यावरुन 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्सफर करुन घेत सुरक्षा मंडळाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी