Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड Somy Ali चा धक्कादायक खुलासा; म्हणाली – ‘काही दिग्दर्शकांना माझ्याशी ठेवायचे होते संबंध’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश करून प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली अलीकडे चर्चेत आहे. सोमी गेली कित्येक वर्षे फिल्मी दुनियेपासून दूर आहे, पण बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असल्यामुळे ती आजही चर्चेत आहे. आता सोमी अलीने बॉलिवूडचा पडद्या मागील चेहरा समोर आणत आपला भयानक अनुभव शेअर केला आहे.

अनेक दिग्दर्शकांना ठेवायचे होते संबंध
एका मुलाखतीत सोमी अलीने बर्‍याच गोष्टींबद्दल चर्चा केली. बॉलिवूडमधील एका वाईट अनुभवाबद्दलही ती उघडपणे बोलली. सोमी अलीने सांगितले की, ‘काही दिग्दर्शकांनी माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. एकूणच इंडस्ट्रीमधील तिचा अनुभव खूपच वाईट होता. बॉलिवूडमध्ये परत येण्याविषयी सोमीने सांगितले की, ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार नाही. सोमी म्हणाली, ‘नाही, मला रस नव्हता किंवा आता परत येण्याची मला इच्छा नाही. मी बॉलिवूडसाठी पूर्णपणे मिसफिट होते.

Advt.

सलमानने मला फसवले
सोमीने मुलाखतीत आपल्या आणि सलमान खानच्या ब्रेकअपविषयी सांगितले. ती म्हणाली कि, ‘त्याच्याबरोबर माझा ब्रेकअप होऊन 20 वर्षे झाली आहेत. त्याने मला चीट केले आणि मी त्याच्यापासून दूर गेले. त्यानंतर मी इथून निघून गेले. मी 5 वर्षांपासून सलमानशी बोलली देखील नाही. आपला मुद्दा पुढे करत सोमी म्हणाली, ‘मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात आले नव्हते. माझा एक्स बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तर, मी येथेच राहण्याचा कोणताही माझा हेतू नव्हता.

सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 16 व्या वर्षी अर्थात 1991 मध्ये ती भारतात आली होती, कारण तिला सलमान खानशी लग्न करायचे होते. हे नाते फार काळ टिकू शकले नाही त्यानंतर 1999 साली दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी गेली. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने अंत ( 1994), कृष्णा अवतार (1993), यार गद्दार (1994), तीसरा कौन? (1994) मध्ये काम केले होते.