खळबळजनक ! प्राध्यापक मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनी घेतला गळफास, अहमदनगर जिल्हयातील घटना

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन –  मुलाने आत्महत्या केल्यानंतर वडीलांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजिवनी साखर कारखाना परिसरात ही घटना घडली आहे. मुलाने गळफास घेतल्याचे समजल्यानंतर वडीलांनीही गळफास लाऊन आत्महत्या केली.

कोपरगाव शहराजवळील संजिवनी साखर कारखाना परिसरात शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री राहुल संजय फडे (वय-27) याने गळफास लावून आत्महत्या केली. राहुल याने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येने फडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. वडीलांना मुलाच्या आत्महत्येने मोठा धक्का बसला.

मुलाचा मृतदेह उतरवून दवाखान्यात नेल्यानंतर पहाटेच्या दरम्यान वडील संजय रंगनाथ फडे (वय-50) यांनीही स्वत:ला गळफास लावून घेत आपलं जीवन संपलं. किरकोळ वादातून मुलाने आत्महत्या केल्यानंतर बापानेही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बाप-लेकाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगावातील शिंगणापूर हद्दीतील संजिवनी कारखाना पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. मुलगा राहूल हा शैक्षणिक संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करत होता.त्याचे दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद कोपरगाव पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट समजू शकले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like