निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी तीन वर्ष फ्रिजमध्ये जतन केला आईचा मृतदेह

कोलकाता : वृत्तसंस्था
आईच्या मृत्यूनंतर मुलाने तीन वर्ष मृतदेहशीतकपाटात जतन करून ठेवला.कोलकाता येथील जेम्स लाँग सरनी या भागात रॉबिन्स रस्त्यावरील एका घरातील ही धक्कादायक घटना आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी लगेचच शुभभ्रता मुजुमदार या ४६ वर्षीय मुलाला, आणि त्यांची आई बिना मुजुमदार (वय :८४ ) यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

शुभभ्रताच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. या मृतदेहावर कोणतेही अंत्यसंस्कार न करता, त्याने तो डीप फ्रिजमध्ये ठेवला. धक्कादायक म्हणजे तीन वर्ष हा मृतदेह घरात असून कोणालाच संशय कसा आला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक प्रसारामाध्यम आणि शेजारच्यांनी दिलेल्या टीप नुसार पोलिसांनी ही कारवाई केली. घराच्या तळमजल्यावर त्याने हे शीत कपाटे ठेवली होती.

शुभभ्रताच्या आईचे 2015मध्ये ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. शुभभ्रता लेदर लेदर तंत्रज्ञानामध्ये पारंगत असल्याने त्याने रसायनांचा वापर करून मृतदेहाचे जतन केले. यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचाही मृतदेह अशाचप्रकारे जतन करण्याची सोय त्याने घरात केली होती.

प्राथमिक चौकशीत शुभ्रभता यांनी सांगितले की, आई तिच्या मृत्यूतर देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांना दुसरे शीतकपाट देखील मिळाले, घरामध्ये रसायनांच्या बाटल्या सापडल्या आहेत. शुभ्रभता त्यांची बहीण आणि दोन पाळीव प्राण्यांसोबत रहात होता.