कलयुग ! जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – वृद्ध आई-वडिलांना मारहाण करणा-या मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडला आहे.

विकी रामचंद्र मारी (३८, रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकणी सगाई रामचंद्र मारी (६५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगाई आणि त्यांचे पती रामचंद्र ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वयोमानानुसार शरीराची हालचाल करता येत नाही. त्यांचा सांभाळ विकी करीत नाही. तसेच तो वारंवार आई-वडिलांना त्रास देतो, मारहाण करतो. सोमवारी दुपारी त्याने बहिणीच्या घरात घुसून बहिणीला मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत पसरवली. याबाबत सगाई यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like