जावयाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू, सासू, पत्नी गंभीर जखमी

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन 

घरात झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात जावयाने लाकडी दांडक्याने सासरा, सासू आणि पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु झाला, तर सासू आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीत पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जावई अजित बाळासो पाटील पळून गेला आहे.

[amazon_link asins=’B01G46PYPO,B077KV7MZ9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1adb3f7b-ba31-11e8-9f8e-79f1e7779e35′]

धोंडिराम मारुती रावण (वय ५५, रा. जवाहरनगर) यांचा मृत्यु झाला असून त्यांची पत्नी राधा व रुपाली अजित पाटील या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याप्रकरणी प्रदीप रावण (वय ३३, रा. जवाहरनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जवाहरनगरमधील भाजी मार्केट येथे रावण यांचे घर आहे. तेथे पहाटे जावई अजित पाटील याच्याबरोबर घरगुती वादातून भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात अजित याने तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात वर्मी घाव बसल्याने धोंडिराम रावण यांचा जागीच मृत्यु झाला. तर राधा व रुपाली पाटील या जखमी झाल्या. त्यांच्या आरडाओरडाने नागरिक जमू लागल्यावर हातातील दांडके तेथेच टाकून अजित पाटील पळून गेला.

ही घटना समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्हींना रुग्णालयात दाखल केले असून अजितचा शोध घेतला जात आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीचा बाजार : शरद पवार यांचे टीकास्त्र