अरे देवा ! मुलीला घटस्फोट देण्याची धमकी देत जावयाने केला सासूवर ‘बलात्कार’

हैदराबाद : वृत्तसंस्था – मुलीला घटस्फोट देण्याची धमकी देऊन जावयाने सासुवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जावयाने सासुवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याप्रकरणी कोणाकडे तक्रार केल्यास मुलीला घटस्फोट देण्याची धमकी दिली. हा प्रकार हैदराबाद येथील बाळापूर मध्ये घडला.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी २७ वर्षीय जावायाला अटक केली आहे. चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, ही घटना ३१ जुलै रोजी घडली आहे. आरोपी कांडाकल येथील रहीवाशी असून त्याचे एक वर्षापूर्वी पीडित महिलेच्या मुलीसोबत लग्न झाले आहे. घटनेच्या दिवशी जावयाने सासूला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर त्याने पीडित महिलेला घरी सोडून याची वाच्चता कोठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीला घटस्फोट देण्याची धमकी दिली.

जावयाने दिलेल्या धमकीला न घाबरता महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून २७ वर्षीय जावयावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास चंद्रयानगुट्टा पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like