…म्हणून मुलानं केला जन्मदात्या वडिलांचा खून

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – दारू प्यायला पैसे नसल्याने शेतात काढून ठेवलेला कापूस विकू दिला नाही म्हणून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी मुलास पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलगा दारुच्या आहारी गेल्यामुळे वडिलांकडे सारखा पैसे मागत होता. यावरून त्यांची नेहमी भांडणं होत होती.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील असलेल्या सोन्याबापू वाकचौरे (वय ७०) यांचा मुलगा संतोष वाकचौरे याने दारूच्या पैशांसाठी आपल्याच वडिलांची हत्या केली. शेतातून काढलेला कापूस विकू देण्यास वडिलांनी तसेच त्याच्या पत्नीनेही नकार दिला. याचाच राग आल्याने संतोषने वडिलांना मारहाण केल्याची घटना काल घडली होती. मारहाणीनंतर सोन्याबापू यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला होता. संतोषच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन आश्वी पोलिसांनी आरोपी संतोष विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलास अटक केली आहे.

संतोषला त्यांच्या आई-वडिलांनी आणि बायकोनेही समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण संतोष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संतोष थोडावेळ शांत बसून पुन्हा पैशासाठी वाद घालत असे. सतत होणाऱ्या वादामुळे त्याचे पालक आणि पत्नीही वैतागली होती.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/