काय सांगता ! होय, 25 वर्षाच्या जावयावर जडलं सासू ‘अनारकली’चं प्रेम, पुण्यात आल्यानंतर घडलं असं काही…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   प्रेम कधी आणि कोणावर होईल याचा काही नेम नाही. अशा प्रकरणातून अनेक विचित्र घटना घडत असतात. या घटना एवढ्या विचित्र असतात, की त्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. पुण्यातील बिबवेवाडीत अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एकजण आपल्या पत्नीला गावी सोडून सासुला घेऊन पुण्यात पळून आला. मात्र या ठिकाणी त्यांचे जमले नाही. अखेर जावयाने सासूचा काटा काढला. पळून जाण्याच्या नादात त्याने एक चूक केली अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

असिफ दस्तगीर आत्तार (वय-25 रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी) असे अटक केल्या जावयाचे नाव आहे. तर अनारकली महमंद तेरणे (वय-45) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी मौलाली मंजलापूर (वय-31 रा. मार्केटयार्ड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. आरोपीने अनैतिक संबंधातून सासूचा गळा दाबून खून केला.

धक्कादायक बाब म्हणजे सासू कर्नाटकातून आपल्या जावयासोबत पुण्यात पळून आली होती. मयत अनारकली ही बेळगावची रहिवाशी आहे. ती काही दिवसांपासून आपल्या 25 वर्षाच्या जावयासोबत बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास होती. मात्र त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यातूनच असिफने सासू अनारकलीचा गळा दाबून खून केला. या घटनेमुळे परिसरात याच घटनेची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी असिफ याचे मृत अनारकली या महिलेच्या मुलीसोबत लग्न झाले होते. नव्या जोपडप्यात सर्व काही सुरळीत आणि आनंदत सुरु होते. त्याचवेळी सासू आणि जावई यांच्यामध्ये जवळीक वाढली. या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. सासूचे जावयावर एवढं प्रेम जडले की, तीने त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. असिफने देखील त्यांच्यातील नात्याला दूर करुन अनारकलीला घेऊन पुण्यात पळून आला. यावेळी त्याने आपल्या पत्नीचा जरा देखील विचार केला नाही. तर सासूने देखील आपल्या मुलीचा विचार केला नाही.

असिफ आणि अनारकली हे पुण्यात पळून आले. त्यांनी बिबवेवाडी परिसरात राहू लागले. असिफ मजुरीचे काम करत होता. पुण्यात आल्यानंतर या दोघांमध्ये सर्व व्यवस्थित सुरु होते. मात्र काही दिवसांनी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होऊ लागले. दररोज होणाऱ्या वादाला असिफ वैतागला होता. दररोज होणाऱ्या वादाला वैतागलेल्या असिफने सासूचा गळा दाबून खून केला.

सासूचा खून केल्यानंतर असिफ तेथून फरार झाला. मात्र, त्याने एक चूक केली. ती म्हणजे आपण आपल्या सासूचा खून केला आहे, हे मित्राला सांगितले. असिफचे कृत्य मित्राला समजताच मित्राने थेट पोलीस ठाणे गाठले. त्याने बिबवेवाडी पोलिसांना सगळी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी असिफचा शोध सुरु केला. असिफ कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.