धक्कादायक ! संपत्तीच्या वादातून वडिलांचा खून करून कुत्र्याला खाऊ घातले मांस

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून पोटच्या मुलानेच वडिलांचा खून केला. तसेच वडिलांचे मांस कुत्र्यांना खायला घातल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील खापरी येथे घडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दत्तू उरवते असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी नामदेव उरवते याला अटक केली आहे.

दत्तू आणि नामदेव यांच्याध्ये शेतीच्या वाटणीवरून वाद होते. जो पर्य़ंत मी जीवंत आहे तोपर्यंत शेतीच्या वाटण्या होणार नाहीत असा पवित्रा दत्तू उरवते यांनी घेतला होता. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होते. बुधवारी रात्री याच मुद्दावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. आरोपी नामदेवचे आई-वडील झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री नामदेवने वडिलांच्या डोक्यात काठीने एकामागून एक वार केले. वर्मी घाव लागल्याने दत्तू यांचा जागीच मृत्यू झाला.

वडिलांचा खून करून नामदवचे समाधान झाले नाही. त्याने वडिलांच्या मृतदेहाचे मांस कुत्र्याला खाऊ घातले. या थरारक घटनेबाबत सकाळी गावकऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी आरोपी नामदेव याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –