वयात आलेलं ‘पोर’ लग्नासाठी आईच्या पाठीमागं लागलं, लहानग्यांचं ‘झालेलं’ पाहून त्यानं मातेलाच संपवलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्यापेक्षा लहान मुलांची लग्न झाली, माझं लग्न का करत नाही असे म्हणत मुलानेच आईवर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोराळे गावात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला अटक केली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

कांताबाई शहाजी शिंदे (वय-55 रा. मोराळे, ता. वडूज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर किरण शहाजी शिंदे (वय- 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरणपेक्षा लहान मुलांची लग्न झाल्याने त्याने आईला तू माझे लग्न का करत नाहीस असा जाब विचारत तिच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात वार केला. वर्मी घाव बसल्याने कांताबाई शिंदे यांचा मृत्यू झाला.

आरोपी किरण शिंदे याने आपल्या राहत्या घरातच आईवर कुऱ्हाडीने वार केले. घटनेच्या अगोदर किरणने आईसोबत लग्नावरून वाद घातले. आईला शिविगाळ करत रागाच्या भरात त्याने घरातील कुऱ्हाडीने आईवर वार केला. त्याला अडवण्यासाठी वडिलांनी घराचा दरवाजा तोडून आत गेले. त्यावेळी आरोपी किरणने वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत शहाजी शिंदे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/