कौतुकास्पद ! वडिल न्यायाधिशाचे ‘ड्रायव्हर’, आता 26 वर्षीय चेतन बनला ‘जज’

इंदोर : वृत्तसंस्था – जर तुम्ही परिश्रमपूर्वक आणि संपूर्ण जोमाने तयारी केली असेल तर परीक्षा कितीही अवघड असो, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. अशीच एक प्रेरणादायक कहाणी इंदोरमध्ये राहणाऱ्या चेतन बजाडची आहे. चेतनचे वडिल कोर्टात ड्रायव्हर आणि आजोबा चौकीदार होते आणि सिव्हील जज भरती पास होत चेतन त्याच कोर्टाचा जज बनला आहे.

जबलपूरमधील मध्य प्रदेश हायकोर्टाकडून आयोजित परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. त्यामध्ये चेतन बजाडचा 13 वा क्रमांक आला आहे. सिव्हील क्लास 2 भरती परीक्षेत त्याने लेखी आणि मुलाखतीत 450 पैकी 257.5 मार्क मिळवले आहेत. विशेष म्हणजे 26 वर्षीय चेतन दुसऱ्याच प्रयत्नात ही परीक्षा पास झाला. त्याने इंदोरमधील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून LLBची डिग्री घेतली आहे.

मिळालेल्या यशाविषयी चेतन म्हणतो की, ‘माझे वडिल गोवर्धनलाल बजाड इंदोर जिल्ह्यातील कोर्टात ड्रायव्हर आहेत. माझ्या आजोबांनी त्याच कोर्टात चौकीदार म्हणून काम केलं आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, तीन मुलांपैकी एकाने तरी जज बनावं. मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. माझे वडिल माझे रोल मॉडेल आहेत. त्यांनीच मला यासाठी प्रेरीत केलं आहे. माझे दोन भाऊ आहेत जे कायद्याची प्रॅक्टीस करत आहेत. त्यांनीही मला खूप मदत केली आहे.’

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like