काय सांगता ! होय, रशियातील 11 व्या क्रमांकाच्या श्रीमंताचा मुलगा राहतो 500 डॉलर महिना ‘रेंट’ असलेल्या फ्लॅटमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलेक्जेंडर फ्रिडमॅन हा रशियातील अकराव्या क्रमांकावर असलेल्या श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. असे असूनही तो स्वतःच्या पायावर उभा आहे, वडील श्रीमंत असून देखील आजही तो मॉस्को येथे 500 डॉलर प्रति महिना देऊन भाड्याच्या घरात राहतो. एवढेच काय पण त्याच्याकडे स्वतःची गाडी देखील नाही. तो रोज मेट्रोने प्रवास करणे पसंत करत.

19 वर्षीय फ्रिडमॅन ने सांगितले की तो स्वतःच्या दैनंदिन आयुष्यसाठी लागणार खर्च स्वतः कमावतो ज्यामध्ये खाण्या पिण्याचा तसेच घरासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश आहे. वडील बिलेणियर असून देखील फ्रिडमॅन लंडनमधील एका हायस्कुल मधून पदवीधर झालेला आहे.

श्रीमंत व्यक्तीचा मुलगा असून देखील स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरु करणायचा निर्णय घेतला. पाच कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन 405,000 डॉलर ने आपला व्यवसाय सुरु केला. पुढील महिन्यात ते एक ऑनलाइन मार्केट फर्म सुरु करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

फ्रिडमॅन यांनी सांगितले की, आज त्यांच्याकडून त्यांच्या वडिलांमुळे नाही तर त्यांनी केलेल्या कामामुळे लोक माल घेत आहेत. मी या आशेने काम करत होतो की कोणताही चमत्कार होणार नाही तर मलाच स्वतःला स्वावलंबी बनावे लागेल असे फ्रिडमॅन यांनी सांगितले.

फ्रिडमॅन यांना स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या जीवावर उभा करायचा आहे. ते म्हणाले की, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे. माझे वडील मला म्हणायचे की, तू माझ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये भागीदार अशील. जर तुला कमाई करायची असेल तर गुंतवणूक करण्यामध्ये देखील तू सक्षम असले पाहिजे.